
KGF फेम कृष्णा जी राव गेल्या अनेक दिवसांपासून जीवन-मरणाची लढाई लढत होते. अखेर बुधवारी या लढाईत त्यांचा पराभव झाला. कृष्णाजी राव यांचे बंगळुरू येथील रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या जाण्याने मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून साऊथ इंडस्ट्रीमध्ये कार्यरत असलेले ते प्रसिद्ध कलाकार आहेत. कृष्णा जी राव (70) यांनी केजीएफमध्ये मुख्य भूमिका साकारली होती आणि या चित्रपटानंतर ते जवळपास 30 चित्रपटांमध्ये दिसले.
कृष्णा जी राव यांना काही दिवसांपूर्वी बेंगळुरूमधील सीता सर्कलजवळील विनायक रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना आयसीयूमध्ये दाखल करण्यात आले होते.
यश स्टारर आणि प्रशांत नील दिग्दर्शित KGF नंतर कृष्णा जी राव यांना प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यांनी KGF मध्ये एक विशेष भूमिका साकारली ज्यामुळे रॉकी (यश) च्या कथेला एक वळण मिळते. यशच्या चित्रपटात त्यांनी एका अंध वृद्धाची भूमिका साकारली होती, ज्यामुळे रॉकीच्या आतली माणुसकी जागृत झाली होती.