अभिनेत्री मौनी रॉय अडकली लग्नबंधनात, पाहा मौनीच्या लग्नाचे फोटो

WhatsApp Group

गोवा – अभिनेत्री मौनी रॉय आणि सूरज नांबियार यांनी आज गोव्यात लग्नगाठ बांधली आहे. मौनी रॉयचे सिंदूर, बोटात अंगठी आणि गळ्यात मंगळसूत्र घातलेले अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतं आहेत. मौनीने पांढऱ्या आणि लाल दक्षिण भारतीय साडीवर दागिने घातले होते. केसात गजरा लावला आहे. त्याचवेळी सूरजने सोनेरी रंगाचा साधा कुर्ता आणि धोतर परिधान केले होते. अभिनेत्रीने तिच्या सोशल मीडिया अकाउंटवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत.

फोटोमध्ये सूरज मौनीला सिंदूर लावताना दिसतं आहे. तर दुसऱ्या फोटोमध्ये सूरज मौनीला मंगळसूत्र घालताना दिसत आहे.

याशिवाय एका फोटोमध्ये मौनी सूरजच्या गळ्यात माळ घालताना दिसत आहे. चौथ्या फोटोत दोघेही हसताना दिसत आहेत. मौनी आणि सूरजला वधू-वराच्या लूकमध्ये पाहणे एखाद्या ट्रीटपेक्षा कमी नाही.

मौनी सोशल मीडिया अकाउंटवर फोटो शेअर करत मौनीने लिहिले, “शेवटी, मी तुला शोधले आहे. कुटुंब आणि मित्रांच्या आशीर्वादाने आम्ही लग्न करत आहोत. आम्हाला तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि प्रार्थनांची गरज आहे.

सूरज नांबियार हा दक्षिण भारतीय असल्यामुळे त्यांच्या संस्कृतीचा आदर करत मल्याळी रितीरिवाजांनुसार हे लग्न पार पडले. मौनी आणि सूरजसाठी फिल्म इंडस्ट्रीकडून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. दिशा परमार, अमित साध, मनीष पॉल, अदा खान या सर्वांनी तिचे अभिनंदन केले आहे.