Motivational Quotes in Marathi: सुंदर दिवसाची सुरुवात करा सुंदर सुविचारांनी

WhatsApp Group

सुविचार मराठी तुमच्या जीवनात नवीन ऊर्जा आणतात. ज्याद्वारे तुम्ही तुमच्या आयुष्यात नवीन उंची गाठू शकता. येथे आम्ही मराठी सुविचार लिहिले आहेत, जे तुम्ही दररोज वाचू शकता आणि सकारात्मक विचाराने तुमचा दिवस सुरू करू शकता. 

क्र. सुविचार मराठी
1 भरलेला खिसा हा माणसाला नेहमी दुनिया दाखवतो, रिकामा खिसा मात्र दुनियेतील माणसं दाखवतो
2 मेहनत येवढ्या शांतपणे करा की, तुमचे यश धिंगाणा घालेल
3 विजेते वेगळ्या गोष्टी करत नाही तर ते प्रत्येक गोष्ट वेगळेपणाने करतात, म्हणूनच ते विजेते ठरतात
4 अपयशाने डगमगू नका व यशाने फुशारून जाऊ नका.
5 परिवर्तन हे काळाचे लक्षण आहे.
6 कलेची पारंबी माणसाला बळ देते.
7 सुखात वाटेकरी खूपच असतात. दुःखात जो वाटेकरी असतो तोच आपला खरा मित्र असतो.
8 तुम्ही जिथे जाल तिथे तुमची गरज निर्माण करा
9 स्त्री ही अशी व्यक्ती आहे, तिला नवऱ्याची बायकोच होऊन चालत नाही तर वेळप्रसंगी त्याची मैत्रिण व त्याची आई सुद्धा व्हावे लागते.
10 श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी.
11 शिक्षणाने माणसातील अज्ञान संपते.
12 सुख दुःखात आपल्या बरोबर असलेला मित्र, हाच खरा मित्र.
13 ग्रंथ हेच आपले गुरु.
14 पुस्तकांनी मनाचा विकास साधतो.
15 खरा मित्र आपली पुस्तके होय.
16 पशुंना धनाची इच्छा नसते पण तीच इच्छा माणसाला पशु बनवते.
17 सत्य हेच अंतिम समाधान असते.
18 कुणीही जन्मतः दुर्जन नसतो. पण त्याला दुर्जन बनवतो तो समाज.
19  अन्याय करणे हे पाप आणि होणारा अन्याय सहन करणे किंवा उघड्या डोळ्यांनी पाहणे हे महापाप आहे !
20 अपयशाच्या कठीण खडकाखालीच यशाच्या पाण्याचा झरा असतो. अपयशाने कधीच खचून जाऊ नका

चांगले विचार मानवाला Motivation देतात आणि त्यांच्या यशाची पायरी बनून त्यांच्या जीवनात एक माध्यम, कॉफीडेन्स देतात. असे मानले जाते, की कर्म हे कर्मश्रेष्ठ आहे, जसे एखाद्या व्यक्तीने केलेले कर्म, तसेच त्याला त्याच फळ मिळते.

 

21 समुद्रात कितीही मोठे वादळ आले तरी समुद्र आपली शांतता कधीही सोडत नाही. तुम्हीही संकटांचा सामना करताना शांत राहा
22 दान देताना बघावे आपले दान योग्य वक्तिला देतो की नाही.
23 तुमच्या अंगी शौर्य नाही तर सांगण्यास घाबरू नका. इतरांना तेवढे ही धारीष्ट नसते.
24 अपयश ही यशाची पहिली पायरी आहे.
25 अंधारातच आहे उद्याचा उषःकाल.
26 आशा व निराशा या दोन्ही सख्या बहिणी आहेत. प्रत्येकाने ठरवायचे की आपण कोणाशी मैत्री करावी.
27 गर्वाने मित्र शत्रू बनतात.
28 रोपाला खतपाणी दिल्याने त्याचा वृक्ष बनतो. तसेच मुलावर संस्कार केले तर त्याचा विकास होतो.
29 आई, वडील, गुरुजन व देश यांच्यावर निष्ठा ठेवावलाच हवी.
30 एखाद्याचे तुम्ही भले करू शकत नसल्यास निदान त्याचे वाईट तरी चिंतू नका.
31 निसर्गाच्या पुढे प्रगतशिल माणूस खुजाच असतो.
32 खोटी ऐट व खोटा मान सोडा. आयुष्यात काही कमी पडणार नाही.
33 सुख हे पैशात नसून ते संतुष्टात असते.
34 पैशाने सर्वकाही घेता येते पण प्रेम पैशाने घेता येत नाही.
35 पैशाने माणूस पशू बनतो.
36 अंगात घातलेला कपडा किती उंची आहे याच्यापेक्षा किती स्वच्छ आहे हे महत्त्वाचे आहे.
37 कपडा मळला तरी धुता येतो पण अब्रूवर पडलेला दाग आपल्या मरणाबरोबर सुद्धा मिटत नाही.
38 आई, वडील ही परमेश्वराची देणगी आहे आणि ती फक्त एकदाच मिळते.
39  संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं, पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात कायम असतं
40 विश्वास हा खोडरबर सारखा असतो तुम्ही केलेल्या प्रत्येक चुकीबरोबर तो कमी होत जातो

ज्या व्यक्तीला यश मिळवायचे असत, त्याला क्षुल्लक घटना ची आणि अपयशाची कधीच भीती वाटत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या छोट्या होडीला समुद्रापुढे झुकायला आवडत नाही, म्हणून मोठया वादळातही बुडत नाही. 

41 टीका करणाऱ्या शत्रूंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा. कारण असे मित्रच जास्त विश्वासघात करतात
42  थोडे दुःख सहन करून दुसऱ्याला सुख मिळत असेल तर आपण थोडे दुःख सहन करायलाॉ काय हरकत आहे
43 आत्मविश्वास हे एक प्रभावी अंजन, हे ज्याच्या डोळ्यात लकाकत असेल त्याला कोणत्याही काळोखातून अचूक मार्ग दिसतो
44 कष्टार्जित धनाला कधी मरण नाही.
45 सुख-समाधान हेच आयुष्याचे खरे धन.
46 वडीलोपार्जित इस्टेटीपेक्षा स्वकष्टाची इस्टेट सर्वांत श्रेष्ठ.
47 बापकमाईच्या हजार रुपयांपेक्षा आपकमाईचा रुपायाच जास्त किंमतीचा आहे.
48 संपत्तीच्या लोभाने भुजंग होऊ नका.
49 अडचणीच्या वेळी सखे-सवंगडी नातेवाईक दूर होतात, पण शेवटी मिळवलेली विद्याच कामी येते.
50 पैसा कितीही प्रिय असला, तरी तो मिळवताना माणुसकी गहाण टाकू नका.
51 पैशावर विश्वास देऊ नये. विश्वासावर पैसा द्यावा.
52 कारण सांगणारी लोक यशस्वी होत नाही. आणि यशस्वी होणारे लोक कारण सांगत नाही
53 जसे काठीने पाणी तोडता येत नाही त्याप्रमाणे रक्ताची नाती तोडून तोडता येत नाहीत.
54 पैशाने मिळविलेल्या प्रेमापेक्षा रक्ताच्या नात्याचे रेशमी प्रेमपाश हे अधिक लवचिक असतात.
55 विजेच्या लखलखाटापेक्षा समईची शितलता मनाला आल्हाद देते.
56 प्रेम हे चंद्रासारखे शितल असते.
57 मुलांवर प्रेम करा पण दुर्गुण पाठीमागे घालू नका.
58 आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा
59 कामात आनंद निर्माण केला की त्याचं ओझं वाटत नाही
60 आवडतं तेच करू नका, जे करावं लागतं त्यात आवड निर्माण करा

एक यशस्वी माणूस म्हणून जगताना मुळात शिकवणीचा पाया हा सुविचाराने रचलेला असतो हे विसरता येत नाही.

61 मोठी स्वप्ने पाहणारेच मोठी स्वप्ने सत्यात उतरवतात
62 कोणत्याही क्षेत्रात यशस्वी व्हायचे असेल, तर अपयश पचविण्यास शिका
63 जगाशी प्रामाणिक राहण्यापेक्षा आधी स्वतःशी प्रामाणिक राहा
64 पैसा झाला उतू नका व नसला तर प्रेम सोडू नका.
65 मान सांगावा जनात अपमान ठेवावा मनात.
66 वाईट सवयीपासून लांब रहाता येते पण सवय लागल्यावर लांब रहाता येत नाही.
67 सूर्य किरणांनी फुले उमलतात तसेच आईच्या प्रेमाने जिवनकळ्या उमलतात…
68 माणूस हा प्रेमाचा भुकेला आहे.
69 आशा ही तेजश्री आहे.
70 धनाच्या श्रीमंतीपेक्षा मनाची श्रीमंती श्रेष्ठ.
71 सर्व फुलात कापसाचे फुल श्रेष्ठ.
72 स्तुतीला भाळू नका निंदेला डरू नका.
73 स्वप्न पाहतच असालं तर मोठीच पाहा. लहान कशाला? कारण मोठी स्वप्नेच माणसाच रक्त ढवळू शकतात
74 परोपकार करणारे संतपुरूष फळाची अपेक्षा कधीच ठेवत नाही.
75 नशिबात जे लिहिलेले आहे ,ते विधिलिखित कोणीच बदलू शकत नाही.
76 दया हा मानवाचा धर्म आहे.
77 तरुण स्त्रीला तिच्या सौदर्यापासूनच भय असते.
78 खूप मोठा अडथळा आला की समजावं आपण विजयाच्या अधिक जवळ आलो
79 जे झालं त्याचा विचार करू नका; जे होणार आहे त्याचा विचार करा
80 जीवनातील प्रत्येक क्षणी शिकणं म्हणजे शिक्षण