
ज्या माणसांकडे विचारांचा भक्कम पाया नाही त्या माणसांच्या आयुष्याची इमारत उभीच राहू शकत नाही. कोणत्याही कृतीच्या मुळाशी एक माणूस म्हणून यशस्वी जीवन जगू पाहणाऱ्या प्रत्येकाने हे मराठी सुविचार Marathi Suvichar 100 % आचरणात आणायला हवं.मला जमत नाही, जमणार नाही असा नकारात्मक विचार करण्यापूर्वी, ती गोष्ट पुन्हा एकदा करा, पुन्हा पुन्हा करा, मग बघा, कोणताही कठीण विषय सुद्धा तुम्हाला सहज जमेल आणि सोपा वाटेल….
1 | केवळ ज्ञान असून उपयोग नाही, ते कसं आणि केव्हा वापरायचं याचंही ज्ञान हवं. |
2 | बाह्यशत्रूपेक्षा बऱ्याच वेळी अंतःशत्रूचीच अधीक भीती असते. |
3 | चिंता ही कुठल्याच दुःखावरचा उपाय होऊ शकत नाही. |
4 | तलवारीच्या जोरावर मिळवलेलं राज्य तलवार असेतोवरच टिकतं. |
5 | दुःखातील दुःखिताला सुख म्हणजे त्याच्या दुःखातला सहभाग होय. |
6 | स्वातंत्र्य हा आपला जन्मसिध्द हक्क आहे पण त्याचा स्वैराचार होऊ न देणं हे आपलं आद्यकर्तव्य आहे. |
7 | स्वतःला पुर्ण ज्ञानी समजणाऱ्याचा विकास खुंटला. |
8 | त्रासाशिवाय विद्या मिळणे अशक्य आहे. नव्हे, त्रास कसा सहन करायचा हे शिकणे हीच विद्या ! |
9 | जगू शकलात तर चंदनासारखे जगा; स्वत: झीजा आणि इतरांना गंध द्या. |
10 | दुबळी माणसे रडगाणी सांगण्यासाठीच जन्माला आलेली असतात. |
ज्या व्यक्तीचे विचार सुंदर असतात, त्यांना कुठेही कधीही पराभूत केले जात नाही, यश हे निश्चित आहे. अफाट कष्ट, कर्म आणि योग्य अनुभव ज्ञानाशिवाय कोणीही यश प्राप्त करू शकत नाही. यश मिळविण्यासाठी आपले मन आणि विचारही शुद्ध असले पाहिजे आहेत.
11 | पाप ही अशी गोष्ट आहे जी लपवली की वाढत जाते. |
12 | उद्याचा भविष्यकाळ वर्तमानाच्या त्यागातून निर्माण होत असतो. |
13 | जो चांगल्या वॄक्षाचा आधार घेतो त्याला चांगलीच सावली लाभते. |
14 | मरावे परी कीर्तीरूपे उरावे. |
15 | आयुष्य जगून समजते; केवळ ऐकून, वाचून, बघून समजत नाही. |
16 | मूर्ख माणसे आपापसात संभाषण करू लागली की शहाण्या माणसाने मौन धारण करणे योग्य. |
17 | बचत म्हणजे काय आणि ती कशी करावी हे मधमाश्यांकडून शिकावं. |
18 | तारूण्य म्हणजे जीवनाचा रचनाकाळ आहे. |
19 | गरिबी असूनही दान करतो तो खरा दानशूर. |
20 | स्वार्थरहीत आणि खरीखुरी सेवा हीच खरी प्रार्थना. |
ज्या व्यक्तीला यश मिळवायचे असत, त्याला क्षुल्लक घटना ची आणि अपयशाची कधीच भीती वाटत नाही. ज्याप्रमाणे एखाद्या छोट्या होडीला समुद्रापुढे झुकायला आवडत नाही, म्हणून मोठया वादळातही बुडत नाही.
21 | जीवन नेहमीच अपूर्ण असते आणि ते अपूर्ण असण्यातच त्याची गोडी साठवलेली असते. |
22 | सत्याला शपथांच्या टेकूची गरज नसते. |
23 | जगात सारी सोंगे करता येतात, पण पैशाच सोंग करता येत नाही. |
24 | संकटं टाळणं माणसाच्या हाती नसतं पण संकटाचा सामना करणं त्याच्या हातात असतं. |
25 | जूनी खपली काढून बुजलेल्या जखमा ताज्या करण्यात शहाणपणा नसतो. |
26 | क्रांती तलवारीने घडत नाही; तत्वाने घडते. |
27 | जो गुरू असेल, तो शिष्य असेलच. जो शिष्य नसेल, तो गुरू नसेल. |
28 | जीवन हा एक पाण्याचा प्रवाह आहे, समुद्र गाठायचा असेल, तर खाचखळगे पार करावेच लागतील. |
29 | जीवन ही एक जबाबदारी आहे. क्षणाक्षणाला दुसऱ्याला सांभाळत न्यावं लागतं. |
30 | वैभव त्यागात असते, संचयात नाही. |
आत्मसंयम, आत्मजाणीव आणि आत्म-सुधारणा ही तीन गुण ज्याच्यापाशी आहेत त्यानं जग जिंकलं असं समजावं.
31 | तुम्हाला सज्जन व्हावेसे वाटत असेल तर आधी तुम्ही वाईट आहात यावर विश्वास ठेवा. |
32 | खोटी टीका करू नका, नाहीतर प्रतिटीका ऐकावी लागेल. |
33 | मनाविरूध्द गोष्ट, म्हणजे ह्रदयस्थ परमेश्वराविरूध्द. |
34 | पुस्तकांसारखा दुसरा मित्र नाही. आपले अंतरंग खुले करते. कधी चुकवत नाही की फसवत नाही. |
35 | ह्रदयात अपार प्रेम असले की सर्वत्र मित्र. |
36 | टीका करणाऱ्या शत्रुंपेक्षा दिखाऊ स्तुती करणाऱ्या मित्रांपासून सावध रहा. |
37 | प्रसंगी थोडे नुकसान झाले तरी चालेल, पण शत्रू निर्माण करू नका. |
38 | मनाला आंनद देण्याचा कोणत्याही पदार्थाचा गुण म्हणजेच सौंदर्य. |
39 | भव्य विचार हा सुगंधासारखा असतो; तो पसरावावा लागत नाही; आपोआप पसरतो. |
40 | वाईट गोष्टींशी असहकार दाखवणे हे मानवाचे आद्य कर्तव्य आहे. |
आयुष्यातील असंख्य समस्यांची फक्त दोनच कारणं असतात एकतर आपण विचार न करता कृती करतो किंवा कृती करण्याऐवजी फक्त विचार करत बसतो.
41 | ज्या गोष्टी कधीच बदलू शकत नाहीत त्यांच्याविषयी कधीही दुःखी होऊ नये. |
42 | जे दुसऱ्याचे स्वातंत्र्य हिरावून घेतात, त्यांना स्वातंत्र्यात राहण्याचा हक्क नाही. |
43 | पुस्तकाइतका प्रांजळ आणि निष्कपटी मित्र दुसरा मिळणार नाही. |
44 | मनाला आंनद, संस्कार देणारी प्रत्येक वस्तू व कृती कलापूर्ण आहे. |
45 | दोष लपवला की तो मोठा होतो आणि कबूल केला की नाहीसा होतो. |
46 | जखम करणारा विसरतो पण जखम ज्याला झाली तो विसरत नाही. |
47 | आकाशाखाली झोपणाऱ्याला कोण लुटणार? |
48 | पिंजऱ्यात कोंडून पाखरं कधीच आपली होत नाहीत. |
49 | आपण परिस्थितीला शरण जाता कामा नये; परिस्थिती आपल्याला शरण गेली पाहिजे. |
50 | अंहकार हा तपःसाधनेचा महान शत्रू आहे. |