Motivational Quotes In Marathi – उत्कृष्ट प्रेरणादायक सुविचार

WhatsApp Group

नमस्कार मित्रांनो!  मित्रांनो जर का तुम्ही मराठीमध्ये Motivational Quotes In Marathi for Success शोधत असाल तर तुम्ही अगदी बरोबर जागी आला आहात. येथे तुम्हाला उत्कृष्ट प्रेरणादायक सुविचार पाहायला मिळतील.

  • काही लोक यशाची नुसती वाट पाहतात, उर्वरित लोक त्यासाठी जीवतोड मेहनत घेतात.
  • मेहनत ही सोनेरी चावी आहे, ती बंद भाग्याचे दरवाजेही उघडते.
  • जो खर्च करू शकतो तोच पैशाच्या खरा मालक आहे. बाकी तर संपत्तीचे रखवालदार आहेत.
  • तारे सदैव चमकत असतात, पण अंधार पडल्यावरच त्यांचे अस्तित्व जाणवते.
  • यशाची दारे नेहमी उघडीच असतात, मात्र ती ओलांडून पूढे जाण्यासाठी प्रचंड मेहनत घ्यावी लागते.
  • यशस्वी आणि अयशस्वी व्यक्तीत धाडस आणि ज्ञानाचे नव्हे तर इच्छाशक्ती हा फरक असतो.
  • जग बदलण्याचा प्रयत्नात अपयश येईल, आधी स्वतःला बदला, यश मिळेल.
  • जेव्हा स्वप्नांची एक निश्चित मुदत ठरते, तेव्हा ते आपोआप उद्दिष्ट होते.
  • कर्माकडे कागद नाही आणि पुस्तकही नाही, तरीही संपूर्ण जगाचा हिशेब त्याच्याकडे असतो.
  • ज्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागला नाही, खरे तर त्यांचे आभार मानले पाहिजेत.

मुलांनो, शिवाजी महाराजाची वेशभुषा करणे, तशी दाढी ठेवणे, सोपे आहे पण महाराजांच्या गुणांचा अभ्यास करा, त्यांचे गुण आत्मसाथ करा, वाईट व्यसनांपासून मुक्त जीवन हा महाराजाचा महत्वाचा गुण आहे, मेहनत, सातत्य, चिकाटी, दूरदृष्टी, पराक्रम आणि स्वत:चे साम्राज्य निर्माण करण्याची इच्छाशक्ति. महाराजांना एकच वेड होते, स्वराज्याचे. हे सर्व जर करु शकलात ,तरच महाराजांना खरी वंदना दिल्यासारखी होईल.

  • जेव्हा तुम्ही काही गमावता, तेव्हा त्यापासून मिळवलेला धडा मुळीच विसरू नये.
  • यश कधीही डोक्यात जाऊ देऊ नका आणि अपयशाला कधीही मनावर घेऊ नका.
  • जिंकण्याची मजा तेव्हाच येत असते, जेव्हा सगळे तुमच्या हरण्याची वाट पाहत असतात.
  • तुमच्या यशाची पातळी तुमची इच्छाशक्ती, स्वप्न आणि निराशा हाताळण्याची क्षमता याद्वारे निश्चित केली जाते.
  • एकदा काम सुरू केले की अपयशाची भीती बाळगू, आणि नये काम हे सोडू नये.
  • टिकेपासून बचावाचा एकच पर्याय आहे, काही न करणे, काही न बोलणे आणि काही न बनणे.
  • यशस्वी माणसं बसून वाट पाहत नाहीत, ते पुढे चालत राहतात आणि लक्ष गाठतात.
  • कर्मापेक्षा कोणताही मोठा धर्म नाही, आणि कष्टापेक्षा कोणतेही मोठे दुसरे कर्म नाही.
  • एखादे काम कितीही अवघड असले, तरी दृढनिश्चयाच्या जोरावर ते सहजपणे तडीस नेता येऊ शकते.
  • अपयशाची चिंता सोडून द्या, तुम्हाला फक्त एकदा योग्य मार्गाची गरज आहे असेल.

मोबाईलचा वापर, जेवणात ज्याप्रमाणे, जितका वापर मिठाचा होतो, तितकाच आणि तसाच वापर जीवनात मोबाईलचा असावा, अगदी चवीपुरता. जेवणात मीठ नसेल तर जेवण अळणी होईल, पण तेच मीठ जर जेवणात अती झाले तर जेवण खाण्यालायक नसणार, तसेच मोबाईल अती झाला तर , जीवनाची वाट लागलेली असेल”

  • मार्गात येणाऱ्या अडचणी म्हणजे, तुम्हाला उत्कर्षाकडे नेणारी पायरी आहे असे समजावे.
  • सबबी न सांगणे हाच यशस्वी होण्याचा अचूक उपाय आहे.
  • सकारात्मक विचार आणि सकारात्मक कामाचा परिणाम म्हणजेच यश असते.
  • स्वत:ला आनंदी ठेवण्याचा सर्वाेत्तम उपाय म्हणजे, दुसऱ्याला आनंद देण्याचा प्रयत्न करणे हाेय.
  • नशिबाचे दार ठोठावत बसण्यापेक्षा आपल्या कर्माचे वादळ निर्माण करा, द्वारे आपोआप उघडतील.
  • यशस्वी होणे म्हणजे पराभव नाही, परंतु अयशस्वी होणे आणि पुन्हा प्रयत्न न करणे म्हणजे पराभव.
  • पूर्ण जिद्दीने जग बदलण्याची इच्छा बाळगणार्‍यापैकी, काही मोजकेच हे कठीण लक्ष गाठू शकता.
  • यशाचे शिखर गाठण्यासाठी शक्ती गरजेचे आहे. मग ते एवरेस्ट असो वा व्यवसायिक.
  • व्यवहार कुशल बनायचे असल्‍यास महान आणि यशस्वी लोकांच्या वागणुकीचे अनुकरण करा.
  • यशाचा कुठलाही मंत्र नाही, ते तर फक्त कष्टाचे फळ आहे.