Motivational Quotes in Marathi: प्रेरणादायक विचार मराठीमध्ये

WhatsApp Group

Motivational Quotes in Marathi: जीवनाला सुंदर बनविण्यासाठी या लेखात सुध्दा आपल्याला बरेच अशे सुंदर सुविचार पाहायला मिळतील Motivational Quotes, जे आपल्याला आयुष्यात एक नवीन वळण देतील. तर चला पाहूया काही प्रेरणादायक विचार..

  • ज्याला खरोखरच लक्ष्य गाठायचे आहे त्याने प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायला हवे.
  • खरं आणि खोटं यात केवळ चार बोटांचं अंतर आहे. आपण कानांनी ऐकतो ते खोटं आणि डोळ्यांनी पाहतो ते खरं.
  • आरामात जीवन जगायचे असेल तर ऐकून घ्या, पाहून घ्या. व्यर्थ बडबड करु नका.
  • तुम्ही इतरांना जे सुख किंवा दुःख द्याल ते सुख दुःख न चुकता तुमच्याकडे परत येईल, हा निसर्गाचा अटल नियम आहे.
  • काळ्याकुट्ट रात्रीनंतर उद्याची लख्ख पहाट असतेच.
  • चांगले काम करायचे मनात आले की ते लगेच करून टाका.
  • आपले अंत:करण जोपर्यंत शुध्द आहे तोपर्यंत कशाचीही भीती बाळगण्याची जरुरी नाही.
  • यशाची ओढ लागलेला मनुष्य कितीही विपरीत परिस्थितीतून यश खेचून आणतोच.

या मराठी सुविचारांमध्ये आपलं जीवन बदलवण्याची शक्ति आहे. जीवनावर लिहिलेले हे मराठी सुविचार फक्त वाचून सोडून देऊ नका तर ते विचार आपल्या जीवनात अवलंबवण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.

  • आयुष्यात आजवर जगलो, प्रेम केलं, हरलो, चुकलो, दुखावलो, विश्वास टाकला, चुका केल्या, पण प्रत्येकवेळी मी शिकत गेलो.
  • शुन्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी असते, तोच खरा कर्तृत्ववान होय.
  • शक्यतो कुणाचेही उपकार घेऊ नका आणि जर का घेतले तर त्या व्यक्तीलाही तशीच मदत करा.
  • ज्याने पावलोपावली आयुष्यात दुःख भोगलंय, तोच नेहमी इतरांना हसवू शकतो, कारण हसण्याची किंमत त्याच्याइतकी कोणालाच ठाऊक नसते.
  • आळसाला तुम्ही आजचा दिवस बहाल केलात की तुमचा उद्याचा दिवस त्याने चोरलाच म्हणून समजा.
  • आयुष्यात असं काहीतरी मिळवा जे तुमच्या पासून कुणीही चोरून घेऊ शकत नाही.
  • संकटात उडी घेऊन जे कार्य करतात त्यांनाच विजयश्री हार घालते.
  • सुंदर चरित्र आणि कर्तव्य कुणाकडूनच उसने मिळत नाही. ते फक्त स्वत:च निर्माण करावे लगते.

या मराठी सुविचारांमध्ये आपलं जीवन बदलवण्याची शक्ति आहे. जीवनावर लिहिलेले हे मराठी सुविचार फक्त वाचून सोडून देऊ नका तर ते विचार आपल्या जीवनात अवलंबवण्यासाठी मनापासून प्रयत्न करा.

  • काही बदलायचं असेल तर सर्वात आधी स्वत:ला बदला.
  • क्रोधाला लगाम घालण्यासाठी मौनाइतका उत्तम मार्ग दुसरा नाही.
  • चुकीचा व्यवहार माणसं तोडतो म्हणून तो सत्याने आणि सन्मानाने करा.
  • यशस्वी व्यक्ती बाकीचे लोक काय करत आहेत याचा विचार करत बसत नाहीत.
  • ढीगभर आश्वासनांपेक्षा टीचभर मदत केव्हाही चांगली.
  • कोणतीच वेळ शुभ किंवा अशुभ नसते. माणूस आपल्या पराक्रमाने एखाद्या वेळेला महत्त्व आणून देतो.
  • प्रत्येक क्षणाचा आनंद घेऊन जगा. कारण गेलेली वेळ परत येत नाही. आणि येणारी वेळ कशी असेल सांगता येत नाही.
  • ज्याच्या जवळ सुंदर विचार असतात तो कधीही एकटा नसतो.