पुण्यातील निर्दयी आईने काही रुपयांसाठी पोटच्या लेकरालाच विकले!

WhatsApp Group

पुणे – एका आईने काही रुपयांसाठी स्वतःच्याच पोटच्या लेकराचा सौदा केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे mother sold her baby. पोलिसांच्या नऊ पथकांनी मिळून हे धक्कादायक प्रकरण समोर आणले आहे. साडेचार वर्षांच्या मुलाच्या विक्री प्रकरणात पुणे पोलिसांनी २४ वर्षीय आईसह सात जणांना अटक केली आहे.

प्रियंका पवार असे अटक करण्यात आलेल्या महिलेचे नाव आहे. प्रियंका ही त्या मुलाची आई असून ती कोथरूड येथे राहत होती. याशिवाय जन्नत बशीर शेख, भानुदास माळी, चंद्रकला माळी, दीपक म्हात्रे, सीताबाई म्हात्रे, तुकाराम निंबाळे आणि रेश्मा सुतार यांचा समावेश आहे. नील पवार या मुलाची पोलिसांनी त्यांच्या तावडीतून सुटका करून त्याला त्याच्या वडिलांच्या ताब्यात दिले आहे.

नीलची आई 4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता कोथरूड पोलीस स्टेशनमध्ये गेली आणि तिने तक्रार दाखल केली की काही अज्ञात व्यक्तीने तिच्या मुलाचे अपहरण केले आहे. या प्रकरणाचा तपास करण्यासाठी कोथरूड, वारजे आणि उत्तमनगर येथून नऊ पोलीस पथके तयार करण्यात आली होती.

लग्नादिवशी नववधूला दिलेले गिफ्ट बघून सगळेच झाले अवाक, पाहा व्हिडीओ

या प्रकरणाचा शोध घेत असताना पोलिसांना महिलेच्या शेजाऱ्यांवर संशय आला. त्यानंतर पोलिसांनी त्यांची चौकशी करण्याचे ठरवले. तसेच विविध ठिकाणचे सीसीटीव्ही फुटेजही स्कॅन करण्यात आले. यानंतर पोलीस पथकाचे नेतृत्व करणाऱ्या अधिकाऱ्यांनी या संपूर्ण प्रकरणात जन्नत शेख आणि मुलाच्या आईचा सहभाग असल्याची पुष्टी केली.

तपासादरम्यान प्रियांका तिच्या पतीपासून वेगळी राहत असल्याचे समोर आले. या जोडप्याला दोन मुले आहेत. नीलचा भाऊ ९ वर्षांचा आहे. प्रियंका आपल्या मुलांचा खर्च भागवू शकत नव्हती. यामुळेच प्रियांकाने जन्नत आणि रेश्मा सुतार यांच्यांशी मिळून मुलगा नीलची विक्री केली

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या लोकांनी भानुदास आणि चंद्रकला माळी यांना एका मध्यस्थामार्फत एक लाख रुपयांना मुलाला विकले. यानंतर चंद्रकला माळीने मुलाला दीपक आणि सीताबाई म्हात्रे यांना १ लाख ६ हजार रुपयांना विकले असल्याचे समोर आले आहे.

जगातील सर्वात उंच इमारतीवर चढली ‘ही’ महिला, धोकादायक स्टंट पाहून लोक झाले अवाक

फक्त २४ तासांत या प्रकरणाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. पोलिसांनी नीलच्या आईकडून 81 हजार रुपयेही जप्त केले आहेत. आरोपींचा मुलांच्या तस्करीशी संबंध आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत.

नीलला विकत घेतलेल्या दाम्पत्याचे म्हणणे आहे की, त्यांना मूलबाळ नाही म्हणून त्यांनी हा गुन्हा केला आहे. मात्र, या प्रकरणाचा पुढील तपास आणि आरोपींच्या चौकशीसाठी या सर्वांना 9 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.