अमूलनंतर मदर डेअरी दूधाच्या किमतीतही वाढ, 6 मार्चपासून नवे दर लागू

WhatsApp Group

नवी दिल्ली – अमूलनंतर (Amul) आता मदर डेअरी (Mother Dairy) या दूध कंपनीनेही दुधाचे दर वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मदर डेअरीने दुधाच्या विविध प्रकारांमध्ये 2 रुपयांपर्यंत वाढ केली आहे Mother Dairy increases price. आता मदर डेअरीचे दूध खरेदी करत असताना ग्राहकांना दोन रुपये अधिक मोजावे लागणार आहेत. नवीन दर 6 मार्च 2022 पासून लागू होणार आहेत.

मदर डेअरीने दिल्ली-एनसीआरमध्ये दुधाच्या दरामध्ये 2 रुपयांनी वाढ करण्याची घोषणा केली आहे. दिल्ली-एनसीआरमधील सर्वात मोठी दूध पुरवठादार मदर डेअरीने सांगितलं की, किमतीत वाढ झाल्याने दुधाचे दर वाढवले ​​जात आहेत. अमूलने दरवाढ केल्यानंतर काही दिवसांनी मदर डेअरीने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. याआधी, अमूलने 1 मार्च 2022 पासून देशभरात दुधाच्या दरात प्रतिलीटर 2 रुपयांनी वाढ केली होती.


अमूलपाठोपाठ मदर डेअरीनेही आपल्या दुधाच्या किंमतीत वाढ केल्याने दुग्धजन्य पदार्थांच्या किंमतीही वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चहा, कॉफी, मिठाईशिवाय तूप, पनीर, चीज, लस्सी यांचेही भाव वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

ब्रेकिंग न्यूज आणि लाईव्ह न्यूज अपडेटसाठी आम्हाला Facebook वर लाईक करा किंवा Twitter वर फॉलो करा.