आयपीएल ही सध्याची सर्वात लोकप्रीय टी-२० लीग आहे. आतापर्यंत आयपीएलमध्ये हजारो षटकार मारले गेले आहेत, परंतु तुम्हाला माहित आहे का की आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू कोण आहे Most sixes in IPL ? आज आम्ही अशाच 3 तुफानी फलंदाजांबद्दल माहिती घेणार आहोत ज्यांनी आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार ठोकले आहेत.
1. ख्रिस गेल (357 षटकार) – आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार हे ख्रिस गेलच्या नावावर आहेत. आयपीएलमध्ये वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल कोलकाता, बंगळुरू आणि पंजाब संघाकडून खेळला आहे. त्याने आतापर्यंत आयपीएलचे 142 सामने खेळले आहेत, ज्यामध्ये त्याने 141 डावात 4965 धावा केल्या असून आयपीएलमध्ये गेलने आतापर्यंत 357 षटकार मारले आहेत.
2. एबी डिव्हिलियर्स (251 षटकार) – दक्षिण आफ्रिकेचा एबी डिव्हिलियर्स त्याच्या शानदार फलंदाजीमुळे आयपीएलमधील सर्वात आवडत्या खेळाडूंपैकी एक आहे. डिव्हिलियर्स मैदानाच्या सभोवताली शॉट्स खेळू शकतो, त्यामुळे त्याला 360 डिग्री बॅट्समन असेही म्हणतात. एबीने आपला सुरुवातीचा हंगाम दिल्ली संघासाठी खेळला पण गेल्या अनेक वर्षांपासून तो आरसीबी संघाचा भाग होता. एबीने आयपीएलमध्ये आतापर्यंत 184 सामने खेळले असून, 170 डावात फलंदाजी करत 5162 धावा केल्या आहेत आणि आयपीएलमध्ये त्याच्या नावावर 251 षटकार आहेत.
3. रोहित शर्मा (227 षटकार) – सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या बाबतीत आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघ मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा तिसऱ्या क्रमांकावर आहे. रोहित त्याच्या वेगवान फलंदाजीसाठी ओळखला जातो. त्याने आतापर्यंत आयपीएलचे 213 सामने खेळले आहेत. रोहितने 208 डावांमध्ये 5611 धावा केल्या असून यादरम्यान त्याच्या बॅटमधून 227 षटकार बाहेर पडले आहेत.