आजकाल जीमेल, इंटरनेट बँकिंग किंवा सोशल मीडिया सारख्या कोणत्याही ऑनलाइन खात्यासाठी पासवर्ड आवश्यक असतो. याशिवाय तुम्ही कोणतेही सोशल मीडिया खाते उघडू शकत नाही. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, इंटरनेटवरील कोणत्याही अकाउंटमध्ये तुम्ही नेहमी मजबूत पासवर्ड तयार करा, जेणेकरून कोणताही हॅकर तो सहजासहजी तोडू शकणार नाही.
जगभरातील पासवर्डचे मूल्यांकन करणार्या नॉर्डपासने कमकुवत पासवर्डची यादी जारी केली आहे. ज्यामध्ये असे पासवर्ड समाविष्ट आहेत जे सहजपणे क्रॅक केले जाऊ शकतात. या यादीत 35 देशांचा समावेश करण्यात आला आहे.
भारतातील सर्वात कमकुवत पासवर्ड कोणते आहेत?
- 123456
- admin
- 12345678
- 12345
- password
- 123456789
- pass@123
- admin@123
नॉर्डपासच्या यादीनुसार, 123456, Admin, 12345678, 12345, password आणि 123456789 पासवर्ड क्रॅक करण्यासाठी एका सेकंदापेक्षा कमी वेळ लागला. त्याच वेळी, pass@123 सारखा पासवर्ड क्रॅक करण्यासाठी 5 मिनिटे आणि admin@123 सारखा पासवर्ड क्रॅक करण्यासाठी 34 मिनिटांपेक्षा जास्त वेळ लागला.
नॉर्डपासने माहिती दिली की ही पासवर्ड यादी एका स्वतंत्र संशोधन गटाने 4.3 टेराबाइट डेटाचे विश्लेषण करून तयार केली आहे. यासाठी सार्वजनिक डेटा वापरण्यात आल्याचे संकेतस्थळाने स्पष्टपणे म्हटले आहे. कंपनीने कुठूनही वैयक्तिक डेटा खरेदी केलेला नाही.