हे 20 Apps सर्वाधिक संपवतात फोनची बॅटरी, कामाचे नसतील तर लगेच करा डिलीट

WhatsApp Group

अनेक स्मार्टफोन युजर्स (Smartphone Users) लवकर बॅटरी संपत असल्याच्या समस्येमुळे त्रस्त असतात. बॅटरी लाइफ वाढवण्यासाठी अनेक छोट्या-मोठ्या ट्रिक अनेकजण वापरत असतात. जर तुम्हालाही अशी समस्या येत असेल, तर तुमच्या फोनमधील Apps तपासण्याची गरज आहे. pCloud तज्ज्ञांनी काही अशा Apps ची लिस्ट तयार केली आहे, ज्यात बॅटरीची सर्वाधिक आवश्यकता असते. असे काही Apps आहेत, जे तुमच्या फोनची बॅटरी सर्वाधिक (Low Battery) संपवतात.

अशी अनेक कारणे आहेत, जी Apps ला बॅटरी-किलर बनवतात. केवळ डार्क मोड ऑप्शनची कमी किंवा कॉम्पलेक्स बॅकग्राउंड फीचर्समुळे Apps ची एफिशियन्सी कमी होऊ शकते. लोकेशन बेस्ड Apps अधिक डिमांडिंग असतात.

सर्वाधिक बॅटरी संपवणाऱ्या लिस्टमध्ये सर्वात वर फिटबिट App आहे. फिटबिट गुगलने 2021 रोजी खरेदी केले होते. App उपयोगमध्ये नसल्यासही 16 पैकी 14 फीचर चालवले जातात. फिटबिट App प्रत्येकवेळी कॅमेरा, लोकेशन, मायक्रोफोन आणि वायफाय कनेक्शन चालवतं.

मोबाइलची बॅटरी सर्वाधिक खर्च करणारे Apps –

Fitbit, Facebook, Instagram, Uber, Tinder, Skype, Bumble, BIGO LIVE, Airbnb, Verizon, WhatsApp, Snapchat, Zoom, Youtube, Telegram, Linkedin, Amazon