वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) एक अहवाल जारी केलाय, ज्यामध्ये असे म्हटले आहे की कंडोमशिवाय शारिरीक संबंध ठेवण्याचा ट्रेंड भारतात वाढला आहे. कोणत्या राज्यांमध्ये कंडोमचा अधिक वापर केला जातो हे देखील नमूद करण्यात आले आहे. पूर्वीच्या तुलनेत आता शारीरिक संबंधादरम्यान कंडोमचा वापर कमी होत असल्याचे अहवालात म्हटले आहे. कंडोमच्या वापराबाबत आरोग्य विभागाकडून लोकांना सातत्याने जागरूक केले जात आहे. पण तरीही त्याचा वापर कमी होत आहे. अशा परिस्थितीत, कोणती राज्ये आहेत जिथे कंडोमचा सर्वाधिक वापर केला जातो ते जाणून घेऊया.
कोणत्या राज्यांमध्ये कंडोमचा सर्वाधिक वापर केला जातो?
वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (2021-22) एक सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणात असंही आढळून आले आहे की, दादरा नगर हवेली हे भारतातील एकमेव ठिकाण आहे जेथे लोकांना कंडोमचे महत्त्व समजले आहे आणि भारतातील इतर राज्यांपेक्षा येथे जास्त लोक कंडोम खरेदी करतात. यानंतर आंध्र प्रदेशचे नाव येतं. जिथे लोक सर्वाधिक कंडोम खरेदी करतात.
हेही वाचा – फिमेल कंडोम म्हणजे काय, कसा वापरला जातो, घ्या जाणून
दादरा नगर हवेलीमध्ये किती कंडोम वापरले जातो?
दादरा नगर हवेलीमध्ये 10 हजार जोडप्यांपैकी 993 जोडपं शारिरीक संबंध ठेवताना कंडोम वापरतात असा अंदाज आहे. यानंतर इतर राज्यांचेही सर्वेक्षण करण्यात आले, ज्यामध्ये प्रत्येक राज्यातील विविध वयोगटातील 10 हजार जोडप्यांशी संवाद साधण्यात आला. आंध्र प्रदेशचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे. जिथे 10 हजार पैकी 978 जोडपे कंडोम वापरतात. तर कर्नाटकचे स्थान 15वे आहे. या राज्यात 10 हजार जोडप्यांपैकी केवळ 307 जोडपी कंडोम वापरतात.
6 टक्के लोकांना कंडोमच्या वापराबाबत माहिती नाही
याच अहवालात भारतातील 6 टक्के लोकांना कंडोमची माहिती नसल्याचा उल्लेख करण्यात आला आहे. केवळ 94 टक्के लोकांना कंडोमबद्दल माहिती आहे.
हेही वाचा – ‘या’ आहेत जगातील सगळ्यात सुंदर महिला, पहा सर्वांचे फोटो
भारतात दरवर्षी सरासरी 33.07 कोटी कंडोम खरेदी केले जातात. जर आपण भारताच्या उत्तर प्रदेश राज्याबद्दल बोललो तर येथे दरवर्षी 5.3 कोटी कंडोम वापरले जातात. हा आकडा इतर राज्यांच्या तुलनेत खूप जास्त आहे. 2024 च्या अखेरीस यूपीची लोकसंख्या 22 कोटींच्या पुढे जाण्याची शक्यता आहे. येथील आरोग्य केंद्र आणि सरकारी रुग्णालयांमध्ये कंडोमची मोफत विक्री केली जाते. पण सर्वेक्षणानुसार आता कंडोमचा वापर कमी होत आहे. पुद्दुचेरीमध्ये 10,000 जोडप्यांपैकी केवळ 960, पंजाबमध्ये 895, चंदीगडमध्ये 822, हरियाणात 685 जोडपं शारिरीक संबंध ठेवताना कंडोम वापरतात. त्याच वेळी, हिमाचल प्रदेशमध्ये 567, राजस्थानमध्ये 514 आणि गुजरातमध्ये 430 लोक कंडोम वापरतात.