
चेन्नई सुपर किंग्जचा कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या नावावर आयपीएलमध्ये अनेक विक्रम आहेत. धोनी सर्वात यशस्वी कर्णधार असून फलंदाज म्हणून त्याचा आयपीएल रेकॉर्डही खूप चांगला आहे. पण यष्टिरक्षक म्हणूनही त्याचे अनेक मोठे विक्रम आहेत. आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल टिपण्याचा विचार केला तर महेंद्रसिंग धोनी पहिल्या क्रमांकावर आहे.
इंडियन प्रीमियर लीगमध्ये धोनी सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे. धोनीने आयपीएलमध्ये आतापर्यंत एकूण 126 झेल घेतले आहेत. हे सर्व झेल त्याने यष्टिरक्षक म्हणून टिपले आहेत.
तर दिनेश कार्तिक या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. कार्तिक हा यष्टिरक्षक देखील आहे आणि या लीगमध्ये आतापर्यंत एकूण 123 झेल घेतले असून तो धोनीनंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक झेल घेण्याच्या बाबतीत एबी डिव्हिलियर्स 118 झेलांसह तिसऱ्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे सुरेश रैना या बाबतीत चौथ्या स्थानावर असून त्याने एकूण 109 झेल घेतले आहेत तर कायरॉन पोलार्ड 96 झेलांसह पाचव्या स्थानावर आहे.
एबी डिव्हिलियर्स आणि सुरेश रैना आता या लीगमध्ये खेळत नाहीत, या लीगमध्ये सर्वाधिक झेल पकडण्याच्या बाबतीत अव्वल 5 खेळाडूंपैकी धोनी, कार्तिक आणि पोलार्ड या हंगामात लीगचा भाग आहेत.
IPL मध्ये सर्वाधिक झेल घेणारे टॉप 5 खेळाडू
- 126 झेल – एमएस धोनी
- 123 झेल – दिनेश कार्तिक
- 118 झेल – एबी डिव्हिलियर्स
- 109 झेल – सुरेश रैना
- 96 झेल – किरॉन पोलार्ड