गणेशोत्सवासाठी कोकणात 2500 एसटी बसेस सोडणार, अनिल परब यांची माहिती

WhatsApp Group

कोकणातील चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा असलेल्या गणपती उत्सवासाठी एसटी महामंडळाने यंदा 25 ऑगस्ट ते 11 सप्टेंबर दरम्यान 2, 5000 जादा गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. 25 जून 2022 पासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष ॲड. अनिल परब  यांच्याकडून देण्यात आली आहे. पहिल्या टप्प्यात 1300 बसेस आरक्षणासाठी उपलब्ध करून देण्यात येणार असून, 25 जून 2022 पासून कोकणात जाणाऱ्या गाड्यांच्या आरक्षणाला सुरुवात होणार आहे.

प्रवासी 5 जुलैपासून परतीच्या गाड्यांचे आरक्षण करू शकतील. मुंबई, ठाणे, पालघर या विभागांतील प्रमुख बसस्थानकातून या जादा बसेस सोडण्यात येतील. कोकणात जाणाऱ्या जास्तीत जास्त चाकरमान्यांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असं आवाहनही परिवहनमंत्री ॲड. अनिल परब यांनी केलेआहे.

गणपती उत्सव म्हणजे कोकणच्या चाकरमान्यांचा अत्यंत जिव्हाळ्याचा सण आहे. त्यामुळे दरवर्षी गणपती उत्‍सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांच्या सेवेसाठी एसटी धावत असते. यंदा सुमारे 2500  जादा गाड्या कोकणातील रस्त्यावर धावतील.