आनंदाची बातमी, पाऊस लवकर येतोय! पुढच्या 24 तासांत मान्सून कोकणात दाखल होणार

WhatsApp Group

Monsoon Update : मान्सूनची (Mosoon) प्रतीक्षा आता लवकरच संपणार आहे कारण मान्सून (Monsoon Update) येत्या 24 तासांमध्ये कोकणामध्ये (Kokan) दाखल होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने (meteorological department) वर्तवला आहे. मान्सूची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी आहे. मान्सून यावर्षी लवकर दाखल होणार होता आवश्यक वातावरण नसल्यामुळे मान्सूनचा प्रवास लांबला होता. अशामध्ये गुरुवारी राज्यातील अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व (Pre Monsoon) पाऊस पडला. या पावसामुळे अक्षरश: मुंबईकरांची (Mumbaikar) तारंबळ उडाली. पावसामुळे रस्ते, रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला.

मान्सून येत्या 24 तासांत कोकणात दाखल होईल त्यानंतर तो हळूहळू महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये सक्रीय होईल, अशी माहिती हवामान खात्याने वर्तवली आहे. हवामान खात्याने काही दिवसांपूर्वी दिलेल्या अंदाजाप्रमाणे मान्सून येत्या 10 जून रोजी दाखल होईल. जर आज मान्सून कोकणात दाखल झाला तर हवामान खात्याचा अंदाज खरा ठरेल. राज्यातील प्रत्येक जण मान्सूची आतुरतेने वाट पाहत आहे. बळीराजा सुद्धा शेतीच्या पुढच्या तयारीला लागण्यासाठी पावसाची वाट पाहत आहे.