Monsoon Update : राज्यात ‘या’ तारखेपासून पाऊस बरसणार

0
WhatsApp Group

मुंबई : राज्यात रखडलेला मान्सून आता लवकरच वेग घेणार असल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली आहे. मोसमी वाऱ्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी सध्या पोषक स्थिती निर्माण झाली आहे. अशात चक्रीवादळही पुढे सरकल्यामुळे आता मान्सूनचा मार्ग मोकळा झाला आहे. राज्यात पुढच्या 3 दिवसांमध्ये मान्सून दाखल होईल असा इशारा हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

भारतीय हवामानशास्त्र पुणे विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनीही यासंबंधी ट्वीट करत ही माहिती दिली आहे. त्यामध्ये त्यांनी म्हटलं की, ’23जूनपासून कोकणातील काही भागांत, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भामध्ये पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे तर 24-25 जूनपासून पावसाचा जोर वाढण्याचा अंदाज वर्तवला आहे.