आनंदाची बातमी! यंदा मान्सून10 दिवस लवकरच; कोकण-मुंबईत कधी होणार दाखल?

WhatsApp Group

मुंबई – मागील काही दिवसांपासून उन्हाच्या झळा मोठ्या प्रमाणात जाणवत आहेत. आणि या झळ्याने घामाच्या धारांनी हैराण झालेल्या नागरिकांना आता लवकरच दिलासा मिळणार आहे. कारण, यंदा मान्सून देशामध्ये १० दिवस अगोदरच दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर पॉडकास्ट संस्थेकडून हा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

बंगालचा उपसागर (Bay of Bengal) आणि अरबी समुद्रामध्ये झालेल्या वातावरणातील (atmosphere) बदलामुळे मान्सून (Monsoon) भारतामध्ये लवकर दाखल होणार असल्याचं सांगितलं जात आहे. यामुळे लवकरच उष्णतेच्या तडाख्यातून नागरिकांची सुटका होईल. युरोपियन सेंटर फॉर मीडियम रेंज वेदर’च्या अंदाजानुसार साधारण २० ते २१ मे या दिवशी मान्सून अंदमानात दाखल होणार आहे. यानंतर २८ ते ३० मे पर्यंत मान्सून केरळमध्ये (Kerala) दाखल होणार आहे.

यामुळे मान्सूनचे लवकर आगमन होणे, हा मोठा दिलासा ठरणार आहे. मान्सूनचा पाऊस (Rain) तळकोकणात कधी दाखल होणार, याचा अंदाज अद्याप हवामान विभागाकडून जाहीर केला नाही. मात्र, मान्सूनचा आजवरचा साधारण प्रवास लक्षात घेता केरळमध्ये आगमन झाल्यावर मान्सून ७ जूनपर्यंत तळकोकणात दाखल होऊ शकणार आहे. यानंतर ४ दिवसांत म्हणजे ११ जूनपर्यंत मान्सून मुंबईमध्ये दाखल होऊ शकणार आहे.