Monsoon Health Tips: पावसाळ्यात मध खाणे आरोग्यासाठी आहे खूपच फायदेशीर

WhatsApp Group

पावसाळ्यात पोटाच्या आरोग्याची (Stomach Health) अधिक काळजी घेणे गरजेचे असते. पावसाळ्यात अनेक आजारांचा प्रादुर्भाव होतो. त्यामुळे या ऋतूत रोगप्रतिकार शक्ती मजबूत ठेवण्याची (Monsoon Health Tips) गरज असते. यासाठी आपल्याला अनेक प्रकारचे सल्ले मिळतात. परंतु आयुर्वेदात रोगप्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या एका विशेष पदार्थाचा उल्लेख आहे. तो पदार्थ म्हणजे बहुगुणी मध. आयुर्वेदानुसार पावसाळ्यात मध (Honey In Monsoon) खाल्ल्यामुळे शरीराला अनेक फायदे होतात. मध खाल्ल्याने भूक वाढते आणि पचनशक्ती सुधारण्यास (Benefits Of Honey In Monsoon) देखील मदत होते.

पावसाळ्यात मध खाण्याचे फायदे

  • मधात व्हिटॅमिन बी, व्हिटॅमिन सी, एमिनो अॅसिड, कार्बोहायड्रेट्स हे मुख्य घटक असतात. यामध्ये अँटीबॅक्टेरियल आणि अँटीसेप्टिक गुणधर्म असतात. त्यामुळे मध जखमेवर, कापल्यास, भाजल्यास उत्तम औषध आहे. यामुळे जखम लवकर बरी होण्यास मदत होते.
  • या हंगामात मध शरीराची प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतो. मधाचे सेवन केल्यास संसर्गजन्य रोगांपासून देखील बचाव होतो.
  • रोज मध खाल्याने किडनी आणि आतडे चांगले राहतात.

साप चावल्यावर काय करावे? हे उपाय करा नक्की जीव वाचेल

  • घसा खवखवणे आणि सर्दी-तापापासून आराम मिळवण्यासाठी देखील मध उपयुक्त ठरतो. खोकला दूर करण्यासाठी दोन चमचे मध आणि एक चमचा आल्याचा रस एकत्र करून सेवन करावा.

 

  • आल्याचा किंवा लिंबाच्या रसात मध घालून खाल्ल्याने पोटदुखीची समस्या दूर होते आणि मळमळ होत असल्यास आराम मिळतो.
  • कफ आणि दम्यासाठी मध खूप रामबाण उपाय आहे. कफ आणि दमा मधामुळे दूर होतो. आल्यासह मध घेतल्यास खोकल्यास आराम मिळतो.
  • मधात असलेले पोषक घटक बद्धकोष्ठतेपासून मुक्तता मिळवण्यासाठी देखील मदत करतात. रात्री कोमट दुधात एक चमचा मध मिसळून प्यायल्यामुळे फायदा होतो.

Hair Fall : केस गळतीची समस्या झटपट दूर करण्यासाठी हे उपाय करुन पहा

  • त्वचेसंबंधित समस्या असल्यास एक ग्लास पाण्यामध्ये एक चमचा मध घाला आणि ते पाणी प्या. हा उपाय नियमित केल्याने तुम्हाला फरक जाणवेल.