
Monsoon Health Tips : पावसाळा (Monsoon) सुरु झाला की वातावरण अतिशय आल्हाददायक असते. आजूबाजूला हिरवळ पाहून मन प्रसन्न होतं. निसर्गातील हिरवळ पाहून मन फारच प्रसन्न होतं. रिमझिम पावसामध्ये भिजण्याचा मोह लहान मुलांसह मोठ्या व्यक्तींनाही आवरता येत नाही. पण असं केल्यामुळे आजारी पडण्याची शक्यता असते. पावसात भिजल्यानंतर अनेकदा लोक आजारी पडतात.
पावसाळ्यात सर्दी आणि संसर्ग होण्याची भीती असते. अशा परिस्थितीत आम्ही काही टिप्स सांगणार आहोत ज्या पावसात तुम्हाला उपयोगी पडतील.
1. पावसात घराबाहेर पडण्यापूर्वी चेहऱ्यावर सनस्क्रीन नक्की लावा. पावसाळ्यातही ऊन्हाची किरणे हानिकारक असतात.
2. घराबाहेर पडताना छत्री आणि रेनकोट सोबत ठेवा.
3. फोन किंवा लॅपटॉप ओले होण्यापासून वाचवण्यासाठी पॉलिथिन किंवा वॉटरप्रूफ कव्हर सोबत ठेवा.
4. पावसाळ्यात पांढरे आणि हलक्या रंगाचे कपडे घालणं टाळा.
5. पावसात हलक्या कापडाची पातळ चादर आणि टॉवेल वापरा, हे कपडे लवकर सुकतात.
6. पावसात रोज कपडे धुवू नका. ज्या दिवशी ऊन जास्त असेल त्या दिवशी कपडे धुवा. कपडे उन्हात वाळवा.
7. पावसात घराबाहेर पडताना प्लास्टिकच्या चप्पल वापरा.
8. अन्नपदार्थ हवाबंद डब्यात बंद ठेवा. लोणचे आणि मुरंबा यांचा डबा घट्ट बंद करून ठेवा. यांना बुरशी लागण्याची शक्यता असते.
9. पावसात भिजल्यावर लवंग, काळी मिरी, आले आणि तुळस यांचा चहा किंवा काढा प्या.
10. तुमचे अंथरुण आणि पांघरून सूर्यप्रकाशात वाळत घाला. यामुळे कुबट वास येण्याचा आणि बुरशीचा त्रास दूर होईल.