Monsoon In India: दक्षिणेकडील केरळ राज्यात मान्सूनचे अखेर आगमन झाले आहे. भारतीय हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, मान्सून आपल्या नियोजित वेळेपूर्वीच केरळमध्ये दाखल झाला आहे. राज्यात अनेक ठिकाणी एकाच वेळी मुसळधार पाऊस पडत आहे. या पावसामुळे नागरिकांनी उन्हापासून सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
आयएमडीच्या म्हणण्यानुसार, यावेळी दोन दिवस आधी मान्सूनचे आगमन होण्याचे मुख्य कारण म्हणजे चक्रीवादळ रेमल. या वादळामुळे मान्सूनचा वेगही वाढला.
#WATCH | Kerala: Rain lashes several parts of Kottayam district
As per IMD, Southwest Monsoon has set in over Kerala and advanced into most parts of Northeast India today, 30th May. pic.twitter.com/0ersoKXonI
— ANI (@ANI) May 30, 2024
मुंबईत 10 जूनपर्यंत मान्सून दाखल होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली आहे. तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 27 जूनपर्यंत मान्सून दाखल होऊ शकतो. त्याचप्रमाणे, जर आपण दक्षिणेकडील राज्यांबद्दल बोललो, तर बंगळुरूमध्ये 13 किंवा 14 जून रोजी प्रवेश होऊ शकतो. कर्नाटकात मान्सूनच्या आगमनाची वेळ ६ जून असल्याचे सांगण्यात येत आहे. पश्चिम बंगालबद्दल बोलायचे झाले तर 10 जूनपासून येथे मान्सूनचे आगमन होऊ शकते.तास आधी केरळमध्ये पोहोचला. या वादळामुळे मान्सून ईशान्येकडेही लवकर पोहोचला आणि दोन्ही मान्सून एकाच वेळी देशात दाखल होत आहेत. तुम्हाला सांगतो की, ईशान्येकडील अनेक राज्यांमध्येही पावसाळा सुरू आहे. मेघालयात सर्वाधिक पाऊस पडत आहे.