Monsoon 2022 : राज्यात कधी दाखल होणार मान्सूनराजा? हवामान खात्याने सांगितली तारीख

0
WhatsApp Group

राज्यात मान्सून कधी दाखल होणार? याकडे सर्व शेतकऱ्यांचे (Farmers) लक्ष लागले असून शेतकऱ्यांनी आतापासूनच शेतीच्या मशागतीची कामे सुरु केली आहेत. आता मान्सूनच्या आगमनाबाबत हवामान अभ्यासक पंजाबराव डख (Panjabrao Dakh) यांच्याकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे.

डख यांनी दिलेल्या माहितीनुसार, 1 ते 3 जून दरम्यान राज्यात पाऊस कोसळणार असून 8 जून रोजी राज्यात मोसमी पावसाची दमदार हजेरी लावून चांगल्या प्रकारे पाऊस होईल, त्यांनी म्हटले आहे.