हॉटेलमध्ये शिरले अन् केळी घेऊन पळाले! माकडांनी मारला बुफेवर डल्ला; चोरीचा भन्नाट व्हिडिओ व्हायरल

WhatsApp Group

माकडं त्यांच्या खोडकर स्वभावासाठी जगभर प्रसिद्ध आहेत. मग ते भारतातील मंदिर असो किंवा परदेशातील एखादे लक्झरी हॉटेल, माकडांना त्यांच्या मर्जीप्रमाणे वागण्यापासून कोणीच रोखू शकत नाही. सध्या सोशल मीडियावर अशाच एका ‘हाय-फाय’ चोरीचा व्हिडिओ व्हायरल होत आहे, जो पाहून तुम्हीही हसल्याशिवाय राहणार नाही. मेक्सिकोमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ कॅनकुन (Cancun) येथील एका हॉटेलमध्ये दोन स्पायडर माकडांनी (Spider Monkeys) चक्क बुफे बारमध्ये शिरून केळी चोरली आहेत.

पाहुणे पाहतच राहिले!

व्हिडिओची सुरुवात हॉटेलच्या बुफे एरियापासून होते, जिथे टेबलवर ताजी फळे सजवून ठेवलेली आहेत. काही पर्यटक तिथे आरामात बसून नाश्त्याचा आस्वाद घेत आहेत. इतक्यात, दोन स्पायडर माकडे अचानक तिथे अवतरतात. कोणत्याही माणसाची भीती न बाळगता, एका माकडाने आपल्या दोन्ही हातांत मावतील तेवढी केळी उचलली आणि तिथून पळ काढला. विशेष म्हणजे, हॉटेलमधील कर्मचाऱ्यांनी किंवा पाहुण्यांनी त्यांना हाकलण्याचा प्रयत्न केला नाही, उलट या गोंडस चोरीचा आनंद लुटला

.

‘नेचरचा टॅक्स’ की ‘फॉर्मल ऑडिट’?

हा १५ सेकंदांचा व्हिडिओ एक्स (X) वर @NatureUnedited नावाच्या हँडलवरून शेअर करण्यात आला आहे. आतापर्यंत हजारो लोकांनी हा व्हिडिओ पाहिला असून त्यावर मजेशीर कमेंट्सचा पाऊस पडत आहे. एका युजरने गमतीने लिहिले, “ही चोरी नाही, तर निसर्गाचा टॅक्स आहे.” दुसऱ्या एकाने टिप्पणी केली, “हे माकडं कदाचित हॉटेलच्या फ्रूट स्टॉकचे ऑडिट करण्यासाठी आले असावेत आणि आपली जमीन वापरल्याचे भाडे केळीच्या स्वरूपात वसूल करत असावेत.”

सोशल मीडियावर व्हिडिओची हवा

प्राण्यांच्या अशा निरागस आणि मजेशीर कृत्यांचे व्हिडिओ इंटरनेटवर नेहमीच पसंत केले जातात. या व्हिडिओमध्ये ज्या पद्धतीने माकडं बुफेला ‘सेल्फ-सर्व्हिस बार’ सारखे वापरत आहेत, ते पाहून नेटकरी लोटपोट झाले आहेत. मेक्सिकोच्या सौंदर्यासोबतच आता या ‘केळी चोरांची’ चर्चा जगभर सुरू आहे.