Monkeypox virus: मंकीपॉक्सने वाढवली चिंता! राज्य सरकारकडून गाईडलाइन्स जारी

WhatsApp Group

कोरोना विषाणूचा (corona virus) प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर जग हळूहळू पूर्वपदावर येत आहे. मात्र आता पुन्हा एका विषाणून जगभरात चिंता निर्माण झाली आहे. मंकीपॉक्स (Monkeypox) असे या व्हायरसचे नाव आहे. या विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची सख्या हळूहळू वाढत आहे. अनेक देशांमध्ये मंकीपॉक्सचा (Monkeypox virus) प्रादुर्भाव झाला आहे.

मंकीपॉक्स हा एक विषाणूजन्य जुनोटिक रोग असून त्याचे विषाणू प्राण्यांपासून माणसात पसरतात अशी माहिती जागतिक आरोग्य संस्थेकडून (World Health Organization) देण्यात आली आहे. भारतासाठी दिलासादायक बाब म्हणजे सध्या देशात मंकीपॉक्सचा एकही रुग्ण (Monkeypox cases) आढळलेला नाही.

IPL 2022: प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक; कधी, कुठे कोणाविरुद्ध होणार सामना एका क्लिकवर जाणून घ्या…

मंकीपॉक्सचे इतर देशांतील प्रकरणे पाहता केंद्र सरकार देखील अलर्ट (Central Government Alert) झाले आहे. केंद्र सरकारने खबरदारीचा उपाय म्हणून आंतरराष्ट्रीय विमानतळं, बंदर आणि देशाच्या सीमाभागांत यंत्रणांना लक्ष ठेवण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच केंद्रीय आरोग्य विभागाने सर्व राज्यांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले आहेत. केंद्राच्या या सूचनेची दखल घेऊन महाराष्ट्र सरकारनेही मंकीपॉक्सबाबत गाईडलाइन्स (State Government Guidelines) जारी केल्या आहेत.

मंकीपॉक्सच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या गाईडलाइन्स

  • मंकीपॉक्सचा प्रादुर्भाव झालेल्या देशांमध्ये गेल्या 21 दिवसांत प्रवास केलेल्या सर्व संशयित रुग्णांवर बारकाईने लक्ष ठेवले जाणार.
  • या संशयित रुग्णांबाबतची माहिती स्थानिक जिल्हाधिकाऱ्यांनी तातडीने आरोग्य विभागाला देण्याच्या सूचना.
  • मंकीपॉक्सच्या संशयित रूग्णांवर उपचार करताना सर्व संसर्ग नियंत्रण पद्धती पाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
  • संशयित रुग्णांच्या तपासणीनंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास तात्काळ कॉन्टॅक्ट ट्रेसिंग सुरू केले जाणार.
  • संशयित रुग्णांची थुंकी आणि रक्ताचे नमुने एनआयव्ही पुणे येथे तपासणीसाठी पाठवले जातील.
  • गेल्या 21 दिवसात रुग्णाच्या संपर्कात आलेल्या लोकांची तात्काळ ओळख करून त्यांना क्वारंटाईन केले जाईल.
  • संशयित रुग्णांच्या सर्व जखमा बऱ्या होईपर्यंत आणि त्वचेचा एक नवीन थर तयार होईपर्यंत रुग्णाला क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात ठेवण्यात येईल.