आज ५ जानेवारी २०२६, सोमवार. आज माघ कृष्ण पक्षातील द्वितीया तिथी सकाळी ९ वाजून ५७ मिनिटांपर्यंत असून त्यानंतर तृतीया तिथीला प्रारंभ होईल. आज रात्री १० वाजून ४७ मिनिटांपर्यंत ‘विष्कुंभ योग’ आणि दुपारी १ वाजून २५ मिनिटांपर्यंत ‘पुष्य नक्षत्र’ असणार आहे. सोमवारी आलेले पुष्य नक्षत्र हे अत्यंत शुभ मानले जाते. या शुभ योगांचा सकारात्मक प्रभाव प्रामुख्याने मेष, वृश्चिक, मीन आणि सिंह या चार राशींवर पाहायला मिळेल. ज्यांचा जन्म सकाळी ५ ते ७ या वेळेत झाला आहे, त्यांच्यासाठीही आजचा दिवस भाग्योदयाचा ठरेल.
मेष ते कर्क: वैचारिक प्रगती आणि यश
-
मेष: आजचा दिवस तुमच्यासाठी उत्कृष्ट असेल. तुमचे विचार ऐकण्यासाठी लोक उत्सुक असतील. तुम्ही इतरांकडून तुमची कामे सहजपणे करून घेऊ शकाल. फक्त कामाच्या ठिकाणी अधिकार गाजवताना संयम ठेवा, अन्यथा परिणामांवर परिणाम होऊ शकतो. (शुभ रंग: जांभळा, शुभ अंक: ३)
-
वृषभ: आजचा दिवस आनंदी जाईल. कला क्षेत्रातील व्यक्तींना प्रसिद्धी मिळेल. आर्थिक बाबतीत तुम्ही घेतलेले विवेकपूर्ण निर्णय भविष्यात फायदेशीर ठरतील. (शुभ रंग: राखाडी, शुभ अंक: ४)
-
मिथुन: रोजगाराच्या शोधात असलेल्यांसाठी आज चांगली बातमी मिळू शकते. नामांकित कंपनीतून मुलाखतीसाठी बोलावणे येईल. उदयोन्मुख लेखकांसाठी आजचा दिवस सुवर्णसंधी देणारा ठरेल. (शुभ रंग: निळा, शुभ अंक: ६)
-
कर्क: यशाच्या नवीन संधी उपलब्ध होतील. कुटुंबासोबत आणि मुलांसोबत अधिक वेळ घालवाल. व्यवसायात धनलाभाचे योग आहेत, मात्र महत्त्वाच्या व्यवहारावेळी रागावर नियंत्रण ठेवा. (शुभ रंग: पिवळा, शुभ अंक: ८)
सिंह ते वृश्चिक: नात्यात सुधारणा आणि धनलाभ
-
सिंह: कामात यश मिळाल्यामुळे अभिनंदनाचा वर्षाव होईल. जुन्या मित्राच्या भेटीमुळे तुमच्या वैयक्तिक समस्या सुटण्यास मदत होईल. नातेवाईकांशी असलेले मतभेद दूर करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. (शुभ रंग: नारंगी, शुभ अंक: ८)
-
कन्या: आजचा दिवस सकारात्मक राहील. भावाच्या मदतीने रखडलेली कामे पूर्ण होतील. कुणालाही न मागता सल्ला देणे टाळा आणि बोलताना भाषेवर नियंत्रण ठेवा. (शुभ रंग: गुलाबी, शुभ अंक: १)
-
तूळ: सौभाग्यशाली दिवस असेल. घाईघाईत निर्णय घेऊ नका, शांत चित्ताने काम केल्यास यश नक्की मिळेल. अविवाहितांसाठी लग्नाचे प्रस्ताव येतील. (शुभ रंग: हिरवा, शुभ अंक: ४)
-
वृश्चिक: दीर्घकाळापासून करत असलेले प्रयत्न आज फळाला येतील. ज्या गोष्टी तुम्ही अशक्य मानल्या होत्या, त्यातून आज शुभ फळ मिळेल. घरात आनंदाचे वातावरण राहील. (शुभ रंग: नेव्ही ब्लू, शुभ अंक: ७)
धनु ते मीन: अध्यात्म आणि नशिबाची साथ
-
धनु: आज दैनंदिन कामात खूप व्यस्त राहाल. कौटुंबिक जबाबदाऱ्यांची जाणीव होईल आणि तुम्ही त्या चोख पार पाडाल. कंत्राटदारांसाठी आजचा दिवस फायदेशीर ठरेल. (शुभ रंग: लाल, शुभ अंक: ८)
-
मकर: आजचा दिवस प्रवासात जाईल. हा प्रवास कामानिमित्त असेल. प्रवासादरम्यान एखाद्या नातेवाईकाची भेट झाल्याने मन प्रसन्न होईल. इंजिनिअर्सना नोकरीची नवीन ऑफर मिळू शकते. (शुभ रंग: सोनेरी, शुभ अंक: ५)
-
कुंभ: आज तुमचा कल अध्यात्माकडे राहील. धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. घरात शांतता लाभेल आणि कौटुंबिक समस्या आपोआप सुटतील. कार्यपद्धतीत थोडा बदल केल्यास अधिक लाभ होईल. (शुभ रंग: पिवळा, शुभ अंक: २)
-
मीन: नशीब तुम्हाला पूर्ण साथ देईल. कामाच्या ठिकाणी तुमची कामगिरी वाखाणण्याजोगी असेल. व्यवसायासाठी नवीन संधी मिळतील. भावंडांसोबत वेळ घालवाल. (शुभ रंग: सोनेरी, शुभ अंक: १)
