कोहलीसारखी फिटनेस कशाला हवी? मी त्याच्यापेक्षा लांब षटकार मारू शकतो- शहजाद

WhatsApp Group

अबू धाबी – आयसीसी टी20 विश्वचषक स्पर्धेत पाकिस्तान आणि न्यूझीलंडकडून पराभूत झाल्यानंतर उपांत्य फेरीचा मार्ग भारतासाठी कठीण झाला आहे. भारताला आता उरलेले तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. याशिवाय न्यूझीलंड आणि अफगाणिस्तानच्या सामन्यांच्या निकालही भारतासाठी खूप महत्वाचा असणार आहे. भारताचा आता तिसरा सामना अफगाणिस्तान संघाशी होणार आहे.

पाकिस्तान आणि न्यूझीलंडविच्या फिरकी गोलंदाजांना खेळताना भारतीय फलंदाजांना खूप त्रास झाला आहे. अशातच अफगाणिस्तानकडे जागतीक दर्जाचे तीन उत्कृष्ट फिरकीपटू आहेत. दुबईतील खेळपट्ट्या फिरकीपटूंसाठी उपयुक्त ठरत आहेत. अशा परिस्थितीत अफगाणिस्तान भारताला कडवे आव्हान देऊ शकते. सामन्यापूर्वी अफगाणिस्तानचा यष्टिरक्षक फलंदाज मोहम्मद शहजादचे एक वक्तव्यही चांगलेच व्हायरल होत आहे.

90 किलो वजनाच्या मोहम्मद शहजादला त्याच्या फिटनेसमुळे अनेकदा टीकेला सामोरे जावे लागते. मात्र, त्यामुळे शहजादला फारसा फरक पडत नाही. आपल्या विनोदी शैलीसाठी प्रसिद्ध असलेल्या शहजादने इंडियन एक्सप्रेसशी संवाद साधला. फिटनेसच्या प्रश्नावर तो म्हणाला, आम्हीही फिटनेसवर पूर्ण लक्ष देतो प्रत्येकजण विराट कोहलीसारखा असू शकत नाही. तो म्हणाला की कोहली षटकार मारतो त्याच्यापेक्षाही लांब षटकार मी मारू शकतो. त्यासाठी त्याच्यासारखा डाएट करायची काही गरज नाही.

तो म्हणाला की, माझे वजन माझ्या क्रिकेटच्या मार्गात कधीच आले नाही. शहजादचे आकडेही हा मुद्दा स्पष्ट करतात. त्याने अफगाणिस्तानसाठी टी-20 मध्ये सर्वाधिक धावा केल्या आहेत. याशिवाय वनडेत धावांच्या बाबतीत तो केवळ मोहम्मद नबीच्या मागे आहे.