
Mohammad Rizwan: पाकिस्तानचा स्टार फलंदाज मोहम्मद रिझवानने मंगळवारी इंग्लंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या टी-20 सामन्यात विशेष स्थान मिळवले. मोहम्मद रिझवानने या सामन्याद्वारे आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 2000 धावा पूर्ण केल्या. यासोबतच रिझवानने जगातील सर्वोत्कृष्ट फलंदाज विराट कोहलीचा विक्रमही मोडीत काढला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रमवारीत पहिल्या क्रमांकावर असलेल्या मोहम्मद रिझवानने पाकिस्तानचा कर्णधार बाबर आझमच्या विक्रमाचीही बरोबरी केली आहे. रिझवानने त्याच्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील 52 व्या डावात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत. टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वात जलद 2000 धावा करण्याच्या बाबतीत रिझवान बाबरच्या बरोबरीने पोहोचला आहे.
विराट कोहलीने आपल्या टी-20 कारकिर्दीतील 56 व्या डावात 2000 धावा पूर्ण केल्या. मात्र आता बाबरनंतर रिझवानही या प्रकरणात कोहलीच्या पुढे पोहोचला आहे. मंगळवारी केएल राहुलनेही आपल्या टी-20 आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत 2000 धावा पूर्ण केल्या. राहुलने कारकिर्दीतील 58व्या डावात हे स्थान गाठले आणि सर्वात जलद 2000 धावा करण्याच्या बाबतीत तो चौथ्या क्रमांकावर आहे. तर अॅरॉन फिंचने कारकिर्दीतील 62 व्या डावात 2000 धावा पूर्ण केल्या आहेत.