नवी दिल्ली – उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे मतदान सुरू होण्याच्या अवघ्या 12 तासांपूर्वीच पंतप्रधान नरेंद्र मोदी PM Narendra Modi यांच्या मुलाखतीने पुन्हा राजकीय वादळ निर्माण झाले आहे. ज्या पद्धतीने त्यांनी घराणेशाही आणि घराणेशाही पक्षांवर जोरदार हल्ला चढवला आहे, त्याचा परिणाम पश्चिम यूपीमध्ये गुरुवारी होणाऱ्या मतदानावर होणार असल्याचे बोलले जात आहे.
कोरेगाव भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना बजावण्यात आली नोटीस
या मुलाखतीत पंतप्रधान नरेंद्र मोदी कुटुंबवादावर निशाणा साधला आहे. यावेळी नरेंद्र मोदींना या पाच राज्यांच्या निवडणुकीत भाजपचा पराभव होण्याची शक्यता आहे का? असा प्रश्न त्यांना विचारण्यात आला. त्याला उत्तर देताना ते अत्यंत प्रामाणिकपणे म्हणाले की, “भारतीय जनता पक्ष हार-पराजयानंतर जिंकू लागला आहे. आम्ही अनेक पराभव पाहिले असल्याचे ते म्हणाले आहेत.
Speaking to @ANI. Watch. https://t.co/z0ybGugG6V
— Narendra Modi (@narendramodi) February 9, 2022
यावेळी त्यांनी मतदान होत असलेल्या पाच राज्यांमध्ये भाजपचेच सरकार येणार असा विश्वास व्यक्त केला. पंतप्रधान पुढे बोलताना म्हणाले की, भाजप या पाचही राज्यात विजयी होईल आणि बहुमताने सरकार स्थापन करणार आहे.