
गणेशोत्सवाच्या निमित्ताने आमदार नितेश राणे यांच्या माध्यमातून कोकणवासीय चाकरमान्यांकरिता दादर ते कणकवली पर्यंत सोडण्यात आलेली मोदी एक्स्प्रेस आज सकाळी १०.३० वाजता दादर स्टेशनवरून कोकणाकडे रवाना झाली. प्रवाशांच्या तुडुंब गर्दीत आणि बाप्पाच्या जयघोषात ही रेल्वे सिंधुदुर्ग साठी रवाना झाली. आमदार नितेश राणे यांनी दादर स्टेशनवर मोदी एक्स्प्रेस ला झेंडा दाखवला. रात्री ८ च्या दरम्यान मोदी एक्स्प्रेस कणकवली स्टेशनवर पोहोचणार आहे.
गेली १० वर्षे अविरतपणे आमदार नितेश राणे यांनी स्वखर्चाने गणेशभक्तांना प्रवासाची सुविधा दिली आहे. ८ वर्षे १०० रुपयांत कोकण प्रवास नंतर गेली २ वर्षे पूर्ण ट्रेन प्रवासासाठी विनामूल्य उपलब्ध करून दिली आहे. दरवर्षी राबवत असलेल्या या उपक्रमाबद्दल गणेशभक्तांनी समाधान व्यक्त करत आमदार नितेश राणे यांचे आभार मानले.