मॉडेल पूनम पांडेचा मृत्यू झाला ‘त्या’ आजाराबद्दल पंतप्रधान मोदींनी घेतला मोठा निर्णय

WhatsApp Group

अभिनेत्री पुनम पांडेचा सरव्हायकल कॅन्सरमुळे वयाच्या 32 व्या वर्षी मृत्यू झाला आहे. पुनमच्या मॅनेजरने (2 फेब्रुवारी) सोशल मिडियाद्वारे याची माहिती दिली आहे. पुनमला सरव्हायकल कॅन्सर झाला होता. भारतात याच्या रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. यावर आता मोदी सरकारनेही मोठे पाऊल उचलले आहे. पुनम पांडेच्या मृत्यूमुळे या आजाराबाबत (Cervical Cancer Free Vaccine) आता अधिक बोललं जात आहे.

मोदी सरकारने घेतला मोठा निर्णय

मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील शेवटचा अर्थसंकल्प (Union budget 2024) (1 फेब्रुवारी) अर्थमंत्री निर्मला सीतारमण (Nirmala Sitharaman) यांनी सादर केला. या अर्थसंकल्पामध्ये अर्थमंत्र्यांनी आरोग्य क्षेत्राबाबत अनेक मोठ्या घोषणा केल्या. यामध्ये सरव्हायकल कॅन्सरबाबतही मोठा निर्णय घेण्यात आला.

रिपोर्टनुसार भारतात सरव्हायकल कॅन्सरचे प्रमाण अधिक आढळून आले आहे. दरवर्षी सवा लाख महिलांना या आजाराशी लढावं लागतं आहे. आता पर्यंत 75 हजार लोकांचा यामुळे मृत्यू झाला आहे. हे प्रमाण वाढत असल्याने केंद्र सरकारने यासंदर्भात मोठा निर्णय घेतला आहे.

महिलांना मोफत लसीकरण

सरकार आता 9 ते 14 वर्षीय मुलींना मोफत लस देणार आहे. या वयातील मुलींची संख्या देशात सध्या अंदाजे 8 कोटी आहे. याचे लसीकरण शाळेतच चालू केले जाणार आहे. सरव्हायकल कॅन्सरशी लढण्यासाठी सध्या बाजारात ह्युमन पॅपिलोमा व्हायरस लस उपलब्ध आहे. मात्र याची किमत सध्या खूप जास्त आहे.

आता मोठ्या प्रमाणात याचे लसीकरण केले जाणार असल्याने याची किमत कमी होण्याची शक्यता आहे. आयुष्यमान भारत योजनेमध्ये गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग रोखण्यासाठी सरकारने लसीकरण (Cervical Cancer Free Vaccine) विकसित केले आहे. महिलांना याची लस मोफत दिली जाणार आहे. तसेच या योजनेत कर्करोग आणि किडनीच्या आजारासह अनेक गंभीर आजारवर उपचार केले जातात.

त्यांच्या या घोषणेनंतर आदर पुनवाला यांनी ट्विट केलं होतं. आदर पुनवाला यांनी सर्वाइकल कॅन्सरविरुद्ध लढणारी लस गेल्यावर्षी आणली होती. त्याची किंमतही त्यांनी कमी ठेवल्याचं त्यावेळी सांगितलं होतं.