मॉडेल दिव्या पाहुजाची गुरुग्राममध्ये हत्या, धक्कादायक व्हिडिओ आला समोर

0
WhatsApp Group

दिल्लीला लागून असलेल्या गुरुग्राममध्ये 27 वर्षीय मॉडेलची हत्या झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. दिव्या पाहुजा (Divya Pahuja) असे मृत मॉडेलचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, हॉटेलमधून निळ्या रंगाच्या बीएमडब्ल्यूमध्ये मॉडेलचा मृतदेह घेऊन जात असताना आरोपींना अटक केली. ही मॉडेल 2016 मध्ये मुंबईत एका वादग्रस्त चकमकीत मारला गेलेला हरियाणातील गँगस्टर संदीप गडोलीची गर्लफ्रेंड असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात येत आहे.

दिव्या पाहुजाचा मृतदेह गुरुग्राममध्ये सापडला, पोलिसांनी हॉटेलवर गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी हॉटेलमधील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. गुरुग्राम पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत दिव्या पाहुजा ही गुरुग्राममधील बलदेव नगर येथील रहिवासी होती. मिळालेल्या माहितीनुसार, दिव्या पाहुजाची हत्या काल रात्री गुरुग्रामच्या बसस्थानका जवळ असलेल्या दिल्ली सिटी हॉटेलमध्ये घडली.