
आजच्या काळात लहान मुलांपासून ते आजी आजोबांपर्यत सर्वांच्या हातात मोबाईल असतोच. प्रत्येकाला अन्न, वस्त्र, निवारा आणि मोबाईल जणू काही मुलभुत गरजचं झाली आहे. मोबाईल वापरा पण काळजी घ्या कारण मोबाईलचा स्फोटा झाल्याची एक धक्कादायक घटना चंद्रपुर शहरातून समोरआली आहे.
आपण सर्वजण आपल्या खिशात मोबाईल ठेवतो त्याच प्रमाणे या व्यक्तीने देखील स्वतच्या खिशात मोबाल ठेवला होता. मात्र अचानक त्या व्यक्तीला त्याचा खिसा गरम वाटू लागला. बघतो तर काय त्या व्यक्तीचा चक्क खिसा जळून खाक झालेला आणि फोन खूप गरम झाला होता त्यातून धूर निगत होता. लगेच त्या व्यक्तीने फोन खिशातून बाहेर काढून फेकून दिला तर अवघ्या दोन मिनिटांत फोनचा मोठा स्फोट झाला.