मुस्लिम प्रेम भोवलं? राज ठाकरेंनी वसंत मोरेंना पुणे शहरप्रमुख पदावरून हटवलं

WhatsApp Group

पुणे – मशिदीवरील भोंग्यांसमोर लाऊडस्पीकर लावून हनुमान चालिसा लावण्याबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे Raj Thackeray यांच्या आदेशानंतर मनसेचे डॅशिंग नगरसेवर वसंत मोरे Vasant More यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर पक्षांतर्गत धुसफूस वाढत असतानाच आता वसंत मोरे यांना मनसे पुणे शहर प्रमुख पदावरुन हटवण्यात आलं आहे.

राज ठाकरे यांची सही असलेला आदेश पक्षातर्फे जारी करण्यात आला आहे. मनसे नगरसेवक साईनाथ बाबर यांच्याकडे आता पुणे शहर प्रमुखपदाची धुरा देण्यात आली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ निवासस्थानी मनसेच्या पुणे पदाधिकाऱ्यांची बैठक पार पडली. यावेळी हा निर्णय घेण्यात आल्याची माहिती आहे.

मनसेने अधिकृत फेसबुक अकाऊंटवरून याबाबत घोषणा केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशाने आज नगरसेवक साईनाथ संभाजी बाबर यांची पक्षाच्या पुणे शहर अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

नव्या जबाबदारीसाठी साईनाथ बाबर यांचे मनःपूर्वक अभिनंदन आणि भावी राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा!” अशी पोस्ट फेसबुकवरुन केली आहे. या पोस्टसोबत राज ठाकरे साईनाथ बाबर यांना जबाबदारीसंदर्भातलं पत्र सोपवत असल्याचा फोटो देखील पोस्ट करण्यात आला आहे.