भाजपच्या झेडपी सदस्यांचा 100 कोटींचा भ्रष्टाचार; ईडीकडे तक्रार, मनसेच्या पोस्टरची रंगली बीडमध्ये चर्चा
बीड – बीडच्या नांदुरघाट जिल्हा परिषदच्या गटामध्ये (Nandurghat Circle of Beed Zilla Parishad) भाजपच्या सदस्याने 100 कोटी रुपयांपेक्षा अधिकच्या विकास निधीच्या रकमेमध्ये भ्रष्टाचार (Corruption of more than 100 crore) केला आहे. याकडे ईडीने लक्ष घालावे, अशी मागणी मनसेच्या बीड जिल्हाध्यक्षांकडून (MNS district president) करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या मागणीचे बॅनर सध्या जिल्हापरिषद सर्कलमधील गावागावात लावल्यामुळे जोरदार चर्चा सध्या सुरु आहे.
मनसेचे जिल्हाध्यक्ष सुमंत धस (Sumant Dhas) यांनी विकास निधीच्या कामामध्ये भ्रष्टाचार केला आहे. याच्या चौकशीची मागणी केली आहे. या भ्रष्टाचाराबाबतची माहिती किरीट सोमय्या यांना देखील देणार आहे असंही त्या बॅनरवर नमूद केले आहे.