
मुंबई – राज्यसभेच्या निवडणुकीमध्ये सहाव्या जागेवर भाजपाच्या धनंजय महाडिक यांचा विजय झाला आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेच्या संजय पवार आणि भाजपाच्या धनंजय महाडिकांमध्ये जोरदार लढत सुरू होती. त्यामध्ये आता धनंजय महाडिकांनी बाजी मारली आहे. यानंतर आता विविध प्रतिक्रिया येत आहेत. या निकालानंतर मनसे नेते संदीप देशपांडे यांनी शिवसेना आणि खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला आहे.
शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ”टीम आहे, हे पुन्हा एकदा सिद्ध झाल’, अशा शब्दात संदीप देशपांडे यांनी ट्वीट करत शिवसेनेची खिल्ली उडवली आहे.
शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ”टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले.
— Sandeep Deshpande (@SandeepDadarMNS) June 11, 2022
शिवसेना ही महाविकास आघाडीतील “ढ”टीम आहे हे पुन्हा एकदा सिद्ध झालं. बोरू बहाद्दर कारकून आणि “ढ” टीम चे कप्तान तोंडावर आपटले. असं ट्वीट करत संदीप देशपांडे यांनी शिवसेनेला पुन्हा एकदा डिवचलं आहे.