सिंधुदुर्ग : कोकण दौऱ्यावर असलेल्या राज ठाकरे (Raj Thackeray Konkan Visit) यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना मोठा दणका दिला आहे. राज ठाकरे (Raj Thackeray) यांचा दौरा पूर्वनियोजीत असूनही पदाधिकाऱ्यांनी कोणतीही हालचाल केली नाही. राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याचा कार्यकर्त्यांना काहीच थांगपत्ताच नव्हता. परिणामी, राज ठाकरे यांनी सिंधुदुर्ग जिल्हा मनसे कार्यकारिणी थेट बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे राज ठाकरे यांच्या कोकण दौऱ्याची वेगळ्या अर्थाने जोरदार चर्चा सुरु आहे.
राज ठाकरे यांचा दौरा पूर्वनियोजित असल्यामुळे कार्यकर्त्यांना या दौऱ्याची माहिती असणे अपेक्षित होते. परंतू, राज ठाकरे प्रत्यक्ष दौऱ्यावर येऊनही कार्यकर्त्यांना याबाबत माहिती असल्याची कोणतीच बाब दिसली नाही. परिणामी पक्षीय पातळीवर कडक पावले उचलत थेट कार्यकारिणीच बरखास्त करण्याचा निर्णय घेतला आहे.
