
पुणे – मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या पुण्यातील सभेची तारीख ठरली आहे. राज यांची २१ तारखेची (शनिवारी) सभा आता २२ मे रोजी (रविवारी) होणार आहे. पुण्याच्या स्वारगेट परिसरामधील गणेश कला क्रीडा रंगमंच इथे राज ठाकरे यांची सायंकाळी ७ वाजण्याच्या सुमारास जाहीर सभा होईल, अशी माहिती मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी दिली आहे.
वाचा – संजय राऊत आणि रवि राणांच्या या फोटोची होतेय चर्चा
अयोध्या दौऱ्याआधी राज ठाकरे पुण्यात जाहीर सभा घेणार आहेत. पहिल्यांदा २१ मे रोजी राज ठाकरे यांच्या सभेचे नदीपात्रात आयोजन करण्यात आलं. पण पावसाची शक्यता लक्षात घेता सभेचे नियोजन बदलून आता ती सभा रविवारी २२ मे रोजी गणेश कला क्रीडा रंगमंच इथे होणार आहे.