
मुंबई – मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांना कोरोनाची लागण झाल्याचे वृत्त हाती आले आहे. त्यामुळे राज ठाकरे यांच्यावर १ जून रोजी होणारी शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. याच शस्त्रक्रियेमुळे राज ठाकरे यांनी आपला अयोध्या दौरा लांबवणीवर टाकला होता. खुद्द राज ठाकरे यांनी पुण्याच्या सभेमध्ये या शस्त्रक्रियेबाबत माहिती दिली होती.