मनसेने फोडली IPL ची बस; जाणून घ्या नेमकं काय झालं?

WhatsApp Group

मुंबई – महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वाहतूक शाखेकडून आयपीएलच्या बसची तोडफोड करण्यात आली आहे. आयपीएलच्या खेळाडूंची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या या व्हॉल्वो बसेसची मनसे कार्यकर्त्यांकडून मंगळवारी रात्री तोडफोड करण्यात आली.

ताज हॉटेलबाहेर असणारी ही बस मनसे कार्यकर्त्यांकडून फोडण्यात आली. यावेळी त्यांनी बसवर ‘मनसेचा दणका’ असे पोस्टर चिकटवत तोडफोड केली.

नेमकं कारण काय?
आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम मुंबईमधील व्यावसायिकांना न दिल्यामुळे मनसे कार्यकर्ते आक्रमक झाले त्यामुळेही तोडफोड करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये सहभागी खेळाडूंच्या प्रवासासाठी महाराष्ट्राच्या बाहेरुन बसेस आणल्या आहेत.

राज्यातील बसेस वाहतूकदारांना हे काम दिले जात नसल्यामुळे मनेसने हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. स्थानिक वाहतूकदारांना आयपीएल खेळाडूंच्या वाहतूक व्यवस्थेचे काम दिले जावे अशी मनसेची मागणी आहे.

आयपीएल २०२२च्या हंगामाला २६ मार्चपासून प्रारंभ होणार आहे. स्पर्धेतील पहिला सामना हा कोलकाता नाईट रायडर्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यातअ मुंबईच्या वानखेडे स्टेडियममध्ये खेळविण्यात येणार आहे.