MLC Final 2023: मुंबई न्यूयॉर्क संघाने पटकावले मेजर क्रिकेट लीगचे जेतेपद

WhatsApp Group

एमआय न्यूयॉर्कने अंतिम सामन्यात सिएटल ऑर्कास संघाचा 7 गडी राखून पराभव करून मेजर क्रिकेट लीगचे विजेतेपद पटकावले. अंतिम सामन्यात एमआय न्यूयॉर्कचा कर्णधार निकोलस पूरनने धडाकेबाज शतक झळकावले आणि आपल्या संघाला विजयाकडे नेले. सिएटल ऑर्कासचा एकही गोलंदाज त्याच्यासमोर टिकू शकला नाही. सिएटल ऑर्कासने एमआय न्यूयॉर्कला विजयासाठी 184 धावांचे लक्ष्य दिले, जे एमआय न्यूयॉर्कने सहज गाठले.

मुंबई इंडियन्स न्यूयॉर्कच्या संघाने लक्ष्याचा पाठलाग करण्यास सुरुवात केली तेव्हा त्यांची सुरुवात चांगली झाली नाही. डावाच्या पहिल्याच षटकात शून्य धावसंख्येवर स्टीव्हन टेलरच्या रूपाने संघाला पहिला धक्का बसला. यानंतर तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी आलेल्या कर्णधार निकोलस पूरनने येताच आपले इरादे स्पष्ट केले. एका टोकाकडून सातत्याने आक्रमक धावा करणाऱ्या निकोलस पूरनने 6 षटकांत संघाची धावसंख्या 80 धावांपर्यंत नेली.

निकोलस पूरनने सिएटल ऑर्कासच्या गोलंदाजांवर एका टोकाकडून आक्रमण सुरूच ठेवले. पूरनने डेवाल्ड ब्रेविससोबत तिसऱ्या विकेटसाठी 44 चेंडूत 75 धावांची भागीदारी केली. एमआय न्यूयॉर्कला या सामन्यात तिसरा धक्का 137 धावांवर ब्रेविसच्या रूपाने बसला, जो 20 धावा करून धावबाद झाला. यानंतर निकोलस पुरनने आपले शतक पूर्ण करून संघाला विजय मिळवून दिला. पुरणच्या बॅटने 55 चेंडूत 10 चौकार आणि 13 षटकारांच्या मदतीने नाबाद 137 धावांची खेळी साकारली.

अंतिम सामन्यातील सिएटल ऑर्कासच्या खेळीबद्दल बोलायचे झाल्यास, क्विंटन डी कॉकच्या बॅटने 52 चेंडूत 9 चौकार आणि 4 षटकारांसह 87 धावांची शानदार खेळी केली. याशिवाय शुभम रांजणेने 29 धावा केल्या. एमआय न्यूयॉर्ककडून गोलंदाजी करताना ट्रेंट बोल्टने 4 षटकात 34 धावा देऊन 3 बळी घेतले, तर राशिद खानने 4 षटकात केवळ 9 धावा देऊन 3 बळी घेतले.