Nilesh Rane : निलेश राणे राज्यपालांवर भडकले, म्हणाले….

WhatsApp Group

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी काल एक वादग्रस्त विधान केल्याने राज्यात खळबळ उडाली आहे. ते एका कार्यक्रमात म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराज हे जुने आदर्श झाले आहेत. जर लोकांची इच्छा असेल तर त्यांना या महाराष्ट्रात नवीन आदर्श सापडतील.  नवीन काळात बाबासाहेब आंबेडकरांपासून ते नितीन गडकरी, शरद पवार यांच्यापर्यंत हिरो इथंच मिळतील.

त्यांच्या या विधानावर विरोधकांकडून टीका सुरू असताना भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांचे सुपुत्र आणि माजी खासदार निलेश राणे यांनी राज्यपालांना खडेबोल सुनावले आहे. महाविकास आघाडी सरकार आणि ठाकरे कुटुंबावर नेहमीच टीका करणारे एकदाही टीकेची संधी न सोडणारे निलेश राणे यांनी राज्यपालांच्या विधानावर संताप व्यक्त केला आहे.

महामहीम राज्यपाल साहेब आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना आजच्या युगातला माणूस कितीही महान असला तरी होऊ शकत नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवरायांचा आहे, महाराज ही व्यक्ती नाही आमचा देव आहे आमची श्रद्धा आहे. महाराजांच्या जागेवर कोणाचीही तुलना करणं महाराष्ट्राला सहन होणार नाही. असं ट्वीट निलेश राणे यांनी केलं आहे.