Mithun Chakraborty Hospitalised: मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

0
WhatsApp Group

Mithun Chakraborty: अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांची प्रकृती बिघडल्याची माहिती समोर आली आहे. त्यांना उपचारासाठी कोलकाता येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मिथुन चक्रवर्ती यांच्या छातीत दुखत होतं आणि त्यांना अस्वस्थ वाटत होतं. यानंतर त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. ते लवकर बरे व्हावेत यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

मिथुन चक्रवर्ती 73 वर्षांचे आहेत. आज सकाळी अचानक त्यांच्या छातीत दुखू लागलं. थोडी अस्वस्थताही जाणवत होती. त्यांची तब्येत आणखी बिघडण्यापूर्वी त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर सध्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र आता त्यांची प्रकृती नेमकी कशी आहे? याबाबत अद्याप कोणतीही माहिती समोर आलेली नाही.