Mithali Raj: मिताली राजने चाहत्यांना दिला मोठा धक्का, अचानक घेतली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती

Mithali Raj : भारताची अनुभवी फलंदाज मिताली राजने क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तिने तिन्ही फॉरमॅटमध्ये टीम इंडियाचे नेतृत्व केले आहे. मितालीने बुधवारी दुपारी सोशल मीडियावर निवृत्तीची घोषणा केली. यासह मितालीने तिच्या २३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला अलविदा केला आहे.
Thank you for all your love & support over the years!
I look forward to my 2nd innings with your blessing and support. pic.twitter.com/OkPUICcU4u— Mithali Raj (@M_Raj03) June 8, 2022
मिताली राजने वयाच्या ३९ व्या वर्षी निवृत्ती जाहीर केली. मिताली राजने ट्विट करून लिहिले की, ‘मी एक लहान मुलगी होते जेव्हा मी निळ्या रंगाची जर्सी घालून माझ्या देशाचे प्रतिनिधित्व केले होते. हा प्रवास सर्व प्रकारचे क्षण पाहण्यासाठी पुरेसा होता, गेली २३ वर्षे माझ्या आयुष्यातील सर्वोत्तम क्षणांपैकी एक होती. इतर प्रत्येक प्रवासाप्रमाणे हा प्रवासही संपत आहे आणि आज मी सर्व प्रकारच्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून माझी निवृत्ती जाहीर करत आहे.
मिताली राज ही भारताची सर्वात यशस्वी महिला फलंदाज आहे. तिने भारतासाठी १२ कसोटी सामन्यांमध्ये ४३.६८ च्या सरासरीने ६९९ धावा केल्या. मिताली राजने टीम इंडियासाठी २३२ एकदिवसीय सामने खेळले, ज्यामध्ये तिच्या बॅटने ७८०५ धावा केल्या. मिताली राजच्या नावावर एकदिवसीय सामन्यांमध्ये ६४ अर्धशतके आणि ७ शतके आहेत, ज्या दरम्यान तिची सरासरी ५०.६८ होती. मिताली राजने ८९ टी-२० सामनेही खेळले ज्यात तिने ३७.५२ च्या सरासरीने २३६४ धावा केल्या.