IPL 2022 : दिल्लीसाठी गुड न्यूज! ऋषभ पंतचं मोठं टेन्शन खल्लास

WhatsApp Group

आयपीएलमध्ये आज (गुरूवार) कोलकाता नाईट रायडर्स विरूद्ध दिल्ली कॅपिटल्स (Kolkata Knight Riders vs Delhi Capitals) यांच्यात लढत होत आहे. केकेआरची टीम सध्या पॉईंट टेबलमध्ये आठव्या स्थानी आहे तर दिल्लीची टीम सातव्या क्रमांकावर आहे. त्यामुळे त्यांच्यासाठी ही मॅच जिंकणे आवश्यक आहे.

केकेआर विरूद्धच्या महत्त्वाच्या मॅचपूर्वी दिल्ली कॅपिटल्ससाठी एक गुड न्यूज समोर आली आहे. मिचेल मार्श (Mitchell Marsh) आणि टीम सायफर्ट (Tim Seifert) हे दिल्लीचे खेळाडू आता कोरोनामधून बरे झाले आहेत. त्यांना मागील आठवड्यात कोरोनाची लागण झाली होती. मार्श आणि सायफर्ट आता फिट असून त्यांनी टीमसोबत प्रॅक्टीस सेशनमध्ये भाग घेतल्याची माहिती दिल्ली कॅपिटल्सने ट्विट करत दिली आहे.

मिचेल मार्शला कोरोनाची लागण झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते. तर मागील आठवड्यात पंजाब किंग्ज विरूद्ध झालेल्या मॅचच्या काही तास आधी सायफर्टला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. आता हे दोघेही फिट असून त्यांनी वानखेडे स्टेडियमवर होणाऱ्या केकेआर विरूद्धच्या मॅचसाठी त्यांनी सरावही केला आहे.