Whatsapp वर येत आहे अनोळखी नंबरवरून मिस्ड कॉल? प्रतिसाद देणं पडू शकतं महागात

0
WhatsApp Group

फसवणूक करण्यासाठी स्कॅमर्स सातत्याने नवनवीन मार्ग शोधत असतात. आता एक नवा स्कॅम व्हॉट्सअ‍ॅप ( WhatsApp) द्वारा सुरू झाला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक लोकांना व्हॉट्सअ‍ॅप वर काही अनोळखी नंबर व्हॉट्सअ‍ॅपद्वारा युजर्सला जाळ्यात अडकवण्याचा प्रयत्न सुरू आहे. कॉल्स आणि मेसेज द्वारा ते अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. यामध्ये प्रामुख्याने साऊथ ईस्ट आशिया देशातील नंबर आहेत. हे स्कॅमर्स नंबर्स +84 व्हिएतनाम, +62 इंडोनेशिया आणि +223 माली येथील नंबर्स आहेत.

स्कॅमर्स इंटरनॅशनल नंबर्स वरून फोन करत असले तरीही ते याच देशातून कॉल करत आहेत असे नाही. ते सीम्स आणि फोन नंबर वापरत आहेत जे जगाच्या कोणत्याही भागात राहून वापरता येऊ शकतात. हे स्कॅम इतके बेसावधपणे केले जात आहेत की लोकं सहज त्यांच्या जाळ्यात अडकतात त्यामुळे पैसे किंवा खाजगी माहिती गमावू शकत आहेत.

सध्या अशा स्कॅम पासून दूर राहण्यासाठी अनोळखी इंटरनॅशनल नंबर्सपासून दूर राहण्याचा सल्ला दिला जात आहे. यामुळे मोठं नुकसान होण्याचा धोका आहे. अनोळखी नंबर असेल तर संपर्क टाळा, फोनवर आर्थिक व्यवहारही टाळा.