
देशभरात आज अनंत चतुर्दशी साजरी केली जात आहे. यानिमित्त अनेक गणेश मंडळ मिरवणूक काढल्या जात आहेत. या मिरवणूकींच अनेक राजकिय पक्ष स्वागत करत आहे. अशाच एका मिरवणूकीच्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यासोबत गैरवर्तन झाल्याची घटना समोर आली. या घटनेने एकच गदारोळ झालेला पाहायला मिळाला. या घटनेचा व्हिडिओ सध्या तूफान व्हायरल होत आहे.
अनंत चतुर्दशी निमित्त विसर्जनासाठी चौपाट्यांवर जय्यत तयारी करण्यात आली आहे. तर काही ठिकाणी कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहे. या विसर्जनाच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या एका स्टेजवर मुख्यमंत्र्यांनी हजेरी लावली होती. यावेळी मुख्यमंत्र्यानी भाषण देखील केले. मात्र भाषणानंतर एका व्यक्तीने स्टेजवर चढून त्यांच्याकढचा माईकच हिसकावला. आणि मुख्यमंत्र्यांना अपशब्द बोलल्याचाही प्रकार घडला. मुख्यमंत्र्यांसोबत गैरवर्तन झाल्याचे पाहून अनेकांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेण्यात आले.
#WATCH | Telangana: A man tried to confront Assam CM Himanta Biswa Sarma by dismantling the mike on a stage at a rally in Hyderabad pic.twitter.com/HFX0RqVEd8
— ANI (@ANI) September 9, 2022
नेमकी घटना काय?
आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा सरमा (himanta biswa sarma) गणेश मूर्ती विसर्जन कार्यक्रमात सहभागी झाले होते. यावेळी भाविकांना संबोधित करताना सीएम सरमा यांनी राजकीय भाषणाला सुरुवात केली.यावेळी ते म्हणाले की, तेलंगणामध्ये एकाचं कुटुंबाचं भलं होत आहे. राज्यातील सर्व लोकांच्या कल्याणासाठी देवाकडे प्रार्थना केली असल्याचे सरमा यांनी यावेळी सांगितले. मुख्यमंत्र्यांच्या भाषणानंतर एक कार्यकर्ता भाविकांना संबोधित करत होता. यावेळी कार्यक्रमात एका व्यक्तीने स्टेजवर चढून शेजारी बोलणाऱ्या नेत्याचा माईक हिसकावला. माईक धरून फिरवल्यानंतर त्या व्यक्तीने सरमा यांना अपशब्द बोलत वाईट वर्तन देखील केलं. यानंतर मंचावर उपस्थित लोकांनी त्या व्यक्तीला मंचावरून खाली उतरवले. या घटनेचा व्हिडिओ आता व्हायरल झाला आहे.