Mirabai Chanu Commonwealth Games 2022: मीराबाई चानूने रचला इतिहास, राष्ट्रकुल स्पर्धेत जिंकले सुवर्णपदक

WhatsApp Group

Mirabai Chanu Commonwealth Games 2022: 2022च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक मिळाले आहे. मीराबाई चानूने महिलांच्या वेटलिफ्टिंग 49 किलो गटात भारतासाठी हे पदक जिंकले. एकूण 201 किलोग्रॅम वजन उचलत मीराबाईनं ही रेकॉर्डब्रेक कामगिरी केली आहे. बर्मिंगहॅम 2022 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताचे हे पहिले सुवर्ण आणि एकूण तिसरे पदक आहे. संकेत सरगरने रौप्य आणि गुरुराज पुजारीने भारतासाठी कांस्यपदक जिंकले आहे.

मीराबाई चानूने गोल्ड कोस्ट येथे झालेल्या 2018 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही सुवर्णपदक जिंकले होते. यासोबतच मीराबाईने 2014 च्या राष्ट्रकुल स्पर्धेतही रौप्यपदक जिंकले होते. आता मीराबाई चानूने बर्मिंगहॅम गेम्समध्ये चमकदार कामगिरी करत सुवर्णपदक जिंकले आहे.

मीराबाई चानूने सुवर्णपदक पटकावल्यानंतर पीएम नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी ट्विट करत तिचं अभिनंदन केलं आहे. याआधी महाराष्ट्राच्या संकेत सरगरने रौप्यपदक पटकावत भारतासाठी पदकांचे खाते उघडले. त्याने वेटलिफ्टींगमध्ये 55 किलोग्रॅम वजनी गटात ही दमदार कामगिरी केली. बर्मिंघम राष्ट्रकुल 2022 स्पर्धेत 49 किलो वजनी गटात भारताच्या मीराबाई चानूने आपल्या पहिल्याच प्रयत्नात 109 किलो वजन उचलून सुवर्णपदक पटकावलं. 2018 राष्ट्रकुल स्पर्धेतही मीराबाई चानूने गोल्डमेडल मिळवलं होतं. ज्यानंतर तिने यंदाच्या स्पर्धेतही सुवर्णपदक मिळवून आपला विजयी प्रवास चालू ठेवला आहे.