
मुंबई – गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने पहिला ‘लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ सोहळा आज षण्मुखानंद सभागृहामध्ये पार पडला आहे. या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आलं आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा देशसेवा आणि समाज कार्यासाठी देण्यात येणारा पुरस्कार आहे. देशाप्रती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे.
मास्टर दीनानाथ प्रतिष्ठान आणि मंगेशकर कुटुंबीयांकडून कलाक्षेत्रामध्ये उत्तम कामगिरी करणाऱ्या कलावंतांचा सन्मान केला जातो. या सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेवर मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे नाव टाकण्यात आलेलं नव्हतं. मात्र मंगेशकर कुटुंबीयांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेत सोहळ्याचं आमंत्रण दिलं होतं, अशी माहिती समोर येत आहे.
दरम्यान आता सदर सोहळ्याच्या निमंत्रणपत्रिकेवर मुख्यमंत्र्यी उद्धव ठाकरे नाव न टाकल्यामुळे मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत निषेध केला आहे. लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबियांनी टाळले.
लता मंगेशकर पुरस्कार सोहळ्याच्या निमंत्रण पत्रिकेवर मुख्यमंत्र्यांचे नाव टाकण्याच मंगेशकर कुटुंबीयांनी टाळले.त्यांची ही भूमिका अगम्य आहे.या राज्यात राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबीयांची ही कृती 12 कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे.#निषेद pic.twitter.com/xVarHhGfou
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) April 24, 2022
त्यांची ही भूमिका अगम्य आहे. या राज्यामध्ये राहून अमाप लोकप्रियता मिळवणाऱ्या मंगेशकर कुटुंबियांची ही कृती १२ कोटी मराठी माणसांचा अपमान करणारी आहे, असं जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत म्हटलं आहे.