15 ते 50 वर्षे रखडलेल्या ‘शिरशिंगे धरण’ प्रकल्पाला अखेर शासनाकडून मान्यता; मंत्री दीपक केसरकर यांनी दिली माहिती

WhatsApp Group

सावंतवाडी : अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या पाटबंधारे विभागाच्या शिरशिंगे या महत्त्वाकांक्षी धरण प्रकल्पाला विशेष बाब म्हणून सरकारनं मान्यता दिली आहे. या प्रकल्पासाठी तब्बल ६५० कोटींची तरतूद करण्यात आली आहे. प्रकल्पामुळे 8 गावे सिंचनाखाली येणार असून, पाण्याचा प्रश्न कायमचा सुटणार आहे. त्यामुळे या सर्व गावांतील शेतकरी सुखी होणार आहेत, अशी माहिती राज्याचे शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.

दीपक केसरकर म्हणाले, “शिरशिंगे येथील धरण प्रकल्प गेली 15 ते 50 वर्षे रखडला होता. याबाबत पाटबंधारे खात्यावर विविध आरोप करण्यात आले होते. आज या प्रकल्पाला मान्यता मिळाल्याने प्रलंबित असलेला एका महत्त्वाचा प्रश्न मार्गी लागत असल्याचा मला आनंद आहे. मला कोणाशीही राजकीय संघर्ष करायचा नाही. माझा सर्वांशी स्नेहबंध आहे. विरोधकांवरही मी तेवढेच प्रेम करतो; परंतु त्यांना काय पाहिजे, हे त्यांनी मला सांगितले पाहिजे. माझी बांधिलकी राज्यातील सर्वसामान्य जनतेशी आहे. म्हणूनच मी शासनाशी भांडूण शिरशिंगे प्रकल्प मार्गी लाव शकलो.याचं मला समाधान आहे.”