निर्बंध उठले, वारकरी पोहोचले, पंढरपूरात लाखो भाविक दाखल

WhatsApp Group

पंढरपूर – श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या माघी एकादशीच्या सोहळ्यानिमित्त पंढरपुरात लाखो भाविकांनी विठोबाच्या दर्शनासाठी हजेरी लावली आहे. महत्वाचे म्हणजे कोरोनाचे निर्बंध उठल्यामुळे आता लॉकडाऊननंतर आता पहिल्यांदाच 8 ते 9 लाख भाविक दर्शनासाठी पंढरात दाखल झाले आहेत. त्यामुळे, भाविकांना विठुरायाच्या दर्शनासाठी रांगेत 7-8 तास वाट पाहावी लागत आहे.

हेही वाचामहाराष्ट्रात तूर्तास मास्कमुक्ती नाही, मात्र निर्बंध शिथिल होणार!

पंढरपुरात माघी यात्रेच्या सोहळ्यासाठी आलेले भाविक सकाळी चंद्रभागेचे स्नान करून विठोबाच्या दर्शनासाठी दर्शनाच्या रांगेत जाऊन थांबतात. ज्यांना दर्शन रांगेत थांबून दर्शन घेता येत नाही असे भाविक विठ्ठल मंदिराच्या कळसाचे दर्शन घेऊन प्रदक्षीणा घालून यात्रा पूर्ण करण्याचं समाधान मानत होते. त्यामुळे विठ्ठल मंदिराच्या परिसरात, चंद्रभागा वाळवंटात, प्रदक्षिणा मार्गावर, आणि दर्शन रांगेत मठात भाविकांची मोठी प्रमाणात गर्दी झाली होती.

हेही वाचा – ना धोनी, ना रोहित ना कोहली…IPL च्या इतिहासात ‘या’ खेळाडूवर लागली होती पहिली बोली

कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. त्याचबरोबर मंदिराच्या समितीकडून मंदिरात कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.