Milind Deora: मिलिंद देवरा यांचा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश

WhatsApp Group

माजी केंद्रीय मंत्री मिलिंद देवरा यांनी रविवारी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश केला आहे.  मिलिंद देवरा हे दक्षिण मुंबईचे माजी खासदार असून ही जागा ठाकरे गटाला जाणार हे स्पष्ट झाल्यानंतर त्यांनी आता शिंदे गटामध्ये जाहीर प्रवेश केला. मिलिंद देवरा यांच्यासोबत काँग्रेसच्या दहा माजी नगरसेवकांनाही शिंदे गटामध्ये प्रवेश केला.

मिलींद देवरांसह शिंदे गटात कोणाकोणाचा प्रवेश झाला?

  • सुशिबेन शहा, राज्य महिला आयोग, माजी अध्यक्ष
  • प्रमोद मांद्रेकर , माजी नगरसेवक
  • सुनिल नरसाळे, माजी नगरसेवक
  • रामवचन मुराई , माजी नगरसेवक
  • हंसा मारु, माजी नगरसेवक
  • अनिता यादव, माजी नगरसेविका
  • रमेश यादव
  • गजेंद्र लष्करी, माजी नगरसेवक
  • प्रकाश राऊत- जनरल सेक्रेटरी मुंबई कॉग्रेस
  • सुशिल व्यास , मारवाडी संमेलन अध्यक्ष
  • पुनम कनोजिया
  • संजय शहा, डायमंड मर्चंट, जैन सेवा संघ- अध्यक्ष
  • दिलीप साकेरिया – मुंबई काॅग्रेस राजस्थानी सेल- अध्यक्ष
  • हेमंत बावधनकर- निवृत्त पोलिस अधिकारी
  • राजाराम देशमुख, सचिव- मुंबई कॉग्रेस – विश्वस्त सिद्धीविनायक मंदीर
  • त्रिंबक तिवारी- सेक्रेटरी, मुंबई कॉग्रेस कमिटी
  • कांती मेहता- ऑल इंडीया जैन फेडरेशन अध्यक्ष
  • 85 वर्षीय काॅग्रेसचे कार्यकर्ते जवाहरभाई मोतीचंद यांचा शिंदे गटात प्रवेश